Gold Rate : सोन्याचा भाव प्रचंड घसरणार? फक्त 120000 रुपयात….सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर! – Marathi News | Gold rate may fall upto 1 lakh 20 thousand know should you sell gold jewellery or not


Gold Rate : आजकाल सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी सोनं आपल्या सार्वकालिक उच्चांकावर जाऊन पोहोचलं होतं. आता मात्र सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. हीच बाब लक्षात घेऊन लोक आपल्याजवळीस सोनं, सोन्याचे दागिने विकत असून नफा मिळवत आहेत. सध्या बाजारात सोन्याचा भाव चांगला आहे. त्यामुळे जुने दागिने विकून त्यातून नफा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे भविष्यकालीन विचार करता सोनं विकून नफा मिळवावा का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सोनं भविष्यात 1.2 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतं

मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत भारतात साधारण 50 टक्के जुनं सोनं विकण्यात आलं आहे. सध्या नफा कमवायची संधी आणि भविष्यात सोन्याचा भाव पडण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे सोनं विकायला काढलं जात असल्याचं बोललं जातंय. भविष्यात सोन्याचा भाव चांगलाच घसरणार आहे, असं अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. सध्याच्या बाजाराची स्थिती लक्षात घेऊन सोनं भविष्यात 1.2 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतं असं म्हटलं जात आहे. त्यामळेच आपले जुने दागिने विकून लोक सद्या नफा पदरी पाडून घेत आहेत.

तुम्ही सोनं विकावं का?

तसं पाहायचं झालं तर सोनं विकायचं की नाही हे ठरवताना विचार केला पाहिजे. सध्या खरंच पैशांची गरज आहे का? हा मुद्दाही सोनं विकताना लक्षात घ्यायला हवा. सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही सोनं खरेदी केलेलं असेल तर ते विकू नये. परंतु तुम्हाला नफाच हवा असेल तर सोनं विकण्याची ही योग्य वेळ असू शकते, असे म्हटले जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *