केतनच्या खुनाचं ‘पँट’ कनेक्शन! सियाने रचला कट; पोलिसांच्या हाती लागणार ‘तो’ सर्वात मोठा पुरावा? | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

सिया-चेतनला कोर्टाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज कोर्टात पोलिसांनी चतेनच्या त्या गूढ पॅन्टचा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.

Lohagad Murder
Lohagad Murder

पुणे : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील केतन अग्रवाल हत्याकांडात रोज खळबळजनक खुलासे होते आहेत. या प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान आज आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सिया-चेतनला कोर्टाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज कोर्टात पोलिसांनी चतेनच्या त्या  पॅन्टचा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशीत दोघांनीही केतनला मारण्यासाठी कट रचला होता, असे प्रथमदर्शन स्पष्ट होते, असे म्हटले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. तर पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी करत आरोपी चेतन चौधरीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादात चेतनच्या वकिलांनी खळबळजनक दावे केलेआहेत. या कटात चेतन सहभागी नव्हताच, असा दावा त्यांनी केला.

चार दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी सात दिवसांनी वाढवण्याची विनंती कोर्टाला केली मात्र कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.  त्यासाठी त्यांनी तीन कारणांचा शोध घ्यायचं असल्याचं म्हटलं आहे. तर त्याला आरोपींच्या वकिलांनी कडाडून विरोध केला आहे. सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. किल्ल्यावर जाऊन रिक्रिएशनही करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा सात दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं होते.

पॅन्टने प्रकरणाला नवं वळण

पहिल्या रिमांड सुनावणीदरम्यान 7 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती. यापूर्वी कोठडी मंजूर करण्यामागे चौकशीदरम्यान आरोपीला समोरासमोर बसवून तपास करणे आणि पंचनामे करणे यांसारखी कारणे होती. आता चेतनची पॅन्ट जप्त करायची आहे? हुडी, मोबाईल, गाडी जप्त केलेली आहे. तेव्हाच पॅन्ट जप्त का केली नाही? असा सवाल चेतनच्या वकिलांनी उपस्थित केला या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही गाडी स्वतः आणून दिली. पॅन्ट मागितली असती तर ती पण आणून दिली असती, असे देखील वकिल म्हणाले.

हे ही वाचा :

मराठी बातम्या/पुणे/

केतनच्या खुनाचं ‘पँट’ कनेक्शन! सियाने रचला कट; पोलिसांच्या हाती लागणार ‘तो’ सर्वात मोठा पुरावा?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *