Tumbadchi Manjula Box Office Collection Day 24: 6 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा दबक्या पावलांनी आला अन् बड्या बड्या बॉलिवूड सिनेमांना लोळवून गेला; कमावला 158 टक्क्यांचा प्रॉफिट; पाहिलाय का?


Tumbadchi Manjula Box Office Collection Day 24: यंदाच्या वर्षी ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) आणि ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) सारख्या मराठी सिनेमांनी (Marathi Movie ) बॉक्स ऑफिसवर मोठी खळबळ उडवून दिलीय. याच वाटेवर चालत, विविध कोरगावकर यांचा ‘तुंबडची मंजुळा’ हा हॉरर-कॉमेडी मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून भारतीय बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या 24 दिवसांत सिनेमानं विक्रमी कमाई करत ‘सुपरहिट’चा दर्जा मिळवलाय. आता, सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा चौथा मराठी सिनेमा ठरण्याच्या मार्गावर आहे. ‘तुंबडची मंजुळा’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईबाबत जाणून घेऊयात… 

‘तुंबडची मंजुळा’नं 24 व्या दिवशी किती कमाई केली? (Tumbadchi Manjula BO Collection)

सई ताम्हणकर (Sai Tamhankar) स्टारर ‘तुंबडची मंजुळा’ मराठी सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चौथ्या आठवड्यात वीकेंडला सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Tumbadchi Manjula Box Office Collection) जोरदार मुसंडी मारली आणि कमाईत मोठी वाढ नोंदवली. ‘सॅकनिल्क’च्या (Sacnilk) सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ‘तुंबडची मंजुळा’नं चौथ्या रविवारी (24 व्या दिवशी) 52 लाख रुपयांची कमाई केलीय. याउलट, चौथ्या शनिवारी (23 व्या दिवशी) सिनेमानं 42 लाख रुपयांचं कलेक्शन केलं होतं. यासह, भारतातील या सिनेमाचे 24 दिवसांचं एकूण नेट कलेक्शन 15.48 कोटी रुपयांवर पोहोचलंय. विशेष म्हणजे, ‘घबाडकुंड’ या दुसऱ्या मराठी सिनेमाकडून याला तगडी स्पर्धा मिळत असूनही, या विनोदी-भयकथा सिनेमाच्या कमाईत सातत्यानं वाढ होतेय.

‘तुंबडची मंजुळा’ यावर्षातली सर्वात मोठी फिल्म (Sai Tamhankar Film Tumbadchi Manjula)

सई ताम्हणकरचा ‘तुंबडची मंजुळा’ सिनेमा 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा चौथा मराठी सिनेमा ठरला आहे. मात्र, यापेक्षा वरचं स्थान त्याला गाठता येणार नाही, कारण 28 कोटी रुपयांच्या कमाईसह ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा सिनेमा तिसऱ्या स्थानावर आहे.

2026 मधील सर्वाधिक कमाई करणारे 5 मराठी सिनेमे 

  • राजा शिवाजी : 105.68 कोटी
  • देऊळ बंद 2 : 72.24 कोटी
  • क्रांतिज्योति विद्यालय मराठी माध्यम: 28 कोटी
  • तुंबाडची मंजुळा : 15.01 कोटी
  • अगं अगं सुनबाई! काय म्हणतंय सासूबाई? : 8.97 कोटी

सुपरहिट ठरला ‘तुंबाडची मंजुळा’?

‘तुंबाडची मंजुळा’ 6 कोटींहून कमी बजेटमध्ये बनलेला सिनेमा आहे. या सिनेमानं रिलीज झाल्यानंतर तब्बल 24 दिवसांत 15.48 कोटींची कमाई केली आहे. आणि या सिनेमानं 9.48 कोटींचं रिटर्न मिळवले आहेत.  यासह, हा कॉमेडी-हॉरर सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Netflix Biggest Series: नेटफ्लिक्सची सर्वात मोठी सीरिज, 4 दिवसांत 31 मिलियन व्यूज, 8 एपिसोड्सनी जगभरात घातलाय धुमाकूळ





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *