मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया.. पुन्हा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ? – Marathi News | Uddhav Thackerays latest remarks on Reunite with Devendra Fadnavis have sparked fresh speculation


निवृत्ती बाबर, प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, शिर्डी येथे सुरु असलेल्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

टीव्ही ९ मराठीशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि मी दोन दोन कोपऱ्याला झाल्यामुळे मधले जे सगळे गोंधळ घालतात ते त्यांच्या लक्षात येत नाहीये.

प्रश्न- सोबत यायला हवं का? देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही सोबत यावं यासाठी तुम्ही पुढाकार घेणार?

उत्तर – तो त्यांचा प्रश्न आहे… मी त्यांचा हितचिंतक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनातली बात मी करतोय. पुढाकार घेण्याबाबत माझ्याकडे काही नाहीये त्यांच्याकडे ऊपरवाले की मर्जी आहे.

प्रश्न -देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान पदाची इच्छा व्यक्त केली तर तुम्ही पाठिंबा द्याल का?

उत्तर – आता जर देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आणि जाहीर केलं की पंतप्रधान पदाची ते तयारी करतात ते राहतील का पक्षात? आता देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान पदाची तयारी करत आहे हे जाहीर करणे म्हणजे आत्मघात करणं आहे. 2029 ला तुम्ही प्रश्न विचारा त्यावेळी उत्तर मी देईल. जेव्हा ते जाहीर करतील तेव्हा मी त्याच्यावर उत्तर देईल. जर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसत असेल तर शिवसेना सोबत का नको राह्याला? महाराष्ट्राचा माणूस पण गद्दार नाही.

प्रश्न – देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची धोक्यात येऊ शकते असं तुम्ही म्हणाला?

उत्तर – देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते हे मी तुम्हाला उदाहरणासह सांगितलं. नितीन गडकरी शिवराज सिंह चव्हाण यांची उदाहरणं दिली. जसं देवेंद्र फडणवीस यांना देवा भाऊ म्हणतात तसं शिवराज सिंह चव्हाण यांना मामा म्हणायचे. त्यांना वाटत होतं शिवराज मामा पंतप्रधान पदाचा चेहरा होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांना वरती दिल्लीत घेतलं.

प्रश्न – फोडाफोडी करत यशस्वी होणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं तुम्हाला वाटतं का?

उत्तर – हा भाजपला धोका आहे. संघ ठरवेल तो भाजपचा मुख्यमंत्री होत होता. संघाची तेवढी पकड राहिली की नाही? फोडाफोडी आणि गद्दारीचे राजकारण संघाला मान्य आहे का?

प्रश्न- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल फेरबदल होईल. श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद दिले जाईल?

उत्तर- लायकी नसताना सुद्धा आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे ही शहा सेनेची इच्छा आहे. त्यामुळे शहा जाणे आणि ते जाणे, देवेंद्र जाणे आणि भाजप जाणे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *