Nasrapur Case Verdict: फक्त महाराष्ट्रासह पुणेच नव्हे तर अवघ्या देशाला हादरवून सोडलेल्या नसरापूर बालिका बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील नराधम आरोपी 65 वर्षीय भीमराव कांबळेला आज (29 जून) पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने निकाल देताना, भीमराव कांबळेच्या कृत्याचा पाढा वाचताना, “आता फासावर चढा” अशा शब्दांत ठणकावलं. गेल्या काही दिवसांपासून या निकालाची चर्चा अवघ्या देशभरामध्ये झाली होती. पुणे पोलिसांनी अवघ्या 16व्या दिवशी आरोपपत्र दाखल केलं. अवघ्या दोन महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निकाल आल्याने पीडितेच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
या नराधमासाठी फाशी पेक्षा कमीच शिक्षा
दरम्यान, या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी तपास केला आणि पुरावे सादर केले, त्या संदर्भात पोलिसांचे कौतुक न्यायालयाने केलं. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या डॉक्टर, सायबर एक्सपर्ट, फॉरेन्सिक तज्ज्ञ यांचे सुद्धा कौतुक केलं आणि एक प्रकारे या आरोपीला फासावर लटकवण्यामध्ये हे सर्व पुरावे निर्णायक ठरल्याचे स्पष्ट केलं. दरम्यान, या निकालामध्ये न्यायाधीशांनी “या नराधमासाठी फाशी पेक्षा कमीच शिक्षा असल्याचं” म्हटलं. न्यायालय म्हणाले की, “या प्रकरणी पोलिसांनी जो तपास केला आहे, त्या संदर्भात ते अभिनंदनास पात्र आहेत. हे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे. तपासामधील सगळेच घटक अभिनंदनासाठी पात्र आहेत,” असं ते म्हणाले. त्यांनी विशेष सरकारी वकिलांचा सुद्धा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, त्यांनी या प्रकरणामध्ये सचोटीने पाठपुरावा केला आणि या प्रकरणाचा तत्काळ निपटारा करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे एक प्रकारे ‘टीम वर्क’ असल्याचंही न्यायाधीशांनी आपल्या निकालामध्ये नमूद केलं.
अवघ्या 16 दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल
ते म्हणाले की, “या आरोपीने 53 वर्षांचा असतानाही एका कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार प्रयत्न केला होता, तेव्हा सुद्धा ती मुलगी अल्पवयीन होती. एका म्हातारीवर देखील त्याने हल्ला केला, तसेच आणखी एका महिलेवर त्याने अत्याचार केला आहे. त्यामुळे या आरोपीला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही, त्यामुळे त्याने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे,” असं न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावताना सांगितलं. अवघ्या 16 दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कोर्टामध्ये या प्रकरणाला पूर्ण वेळ देण्यात आला होता. त्यामुळे खटला 16 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणामध्ये 55 साक्षीदार तपासण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा