Netflix Biggest Series: नेटफ्लिक्सची सर्वात मोठी सीरिज, 4 दिवसांत 31 मिलियन व्यूज, 8 एपिसोड्सनी जगभरात घातलाय धुमाकूळ


Netflix Biggest Series: हार्लन कोबेन (Harlan Coben) यांच्या पुस्तकावर आधारित ‘आय विल फाइंड यू’ (I Will Find You) ही नवी थ्रिलर सीरिज (Thriller Series) नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रचंड लोकप्रिय ठरलीय. रिलीज झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच या सीरिजनं 3 कोटी 10 लाख व्ह्यूज मिळवलेत. तसेच, 2026 मधील ही सर्वात मोठी नवी सीरिज ठरलीय. सॅम वर्थिंग्टन यांची मुख्य भूमिका असलेली ही आठ भागांची मिस्ट्री-थ्रिलर सीरिज (Mystery Thriller Series) रिलीज होताच जागतिक स्तरावरील चार्ट्समध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलीय. प्रेक्षकांना ही सीरिज खूप आवडत असून ते सलग (Binge Watch) पूर्ण पाहत आहेत. सोशल मीडियावरील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि चर्चांमुळे सीरिजची लोकप्रियता आणखी वाढली आहे. नेटफ्लिक्सनं स्वतः या आकडेवारीला दुजोरा दिलाय.

हार्लन कोबेन यांच्या कादंबऱ्यांवर आधारित सीरिज यापूर्वीही नेटफ्लिक्ससाठी प्रचंड यशस्वी ठरल्या आहेत. ‘द इनोसंट’ (The Innocent), ‘द स्ट्रेंजर’ (The Stranger) आणि ‘स्टे क्लोज’ (Stay Close) यांसारख्या सीरिजनी धक्कादायक ट्वीस्ट आणि थ्रीलच्या (Cliffhangers) माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. ‘आय विल फाइंड यू’ ही सीरिजही तीच परंपरा पुढे चालू ठेवताना दिसतेय. या मालिकेची कथा एका अशा रहस्याभोवती फिरते, ज्यामुळे मुख्य पात्राला आपल्या भूतकाळाचा आणि अनेक खोलवर दडलेल्या गुपितांचा सामना करावा लागतो.

‘अवतार’ (Avatar) आणि ‘क्लॅश ऑफ द टायटन्स’ (Clash of the Titans) सारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात आलेला सॅम वर्थिंग्टन या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या दमदार अभिनयाने आणि कोबेनच्या (Coben) प्रभावी कथाकथनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच, सोशल मीडियावर चाहते या मालिकेतील कथानकातील अनपेक्षित वळणे आणि कलाकारांच्या अभिनयाचे सातत्याने कौतुक करत आहेत. अनेक प्रेक्षकांनी याला ‘2026 मधील सर्वोत्तम थ्रिलर’ असं संबोधलंय.

2026 मधील स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समधील मोठी स्पर्धा पाहता, नेटफ्लिक्ससाठी हे यश विशेष महत्त्वाचं आहे. ‘आय विल फाइंड यू’ (I Will Find You) या सीरिजचं यश हे सिद्ध करतंय की, प्रेक्षक आजही प्रभावी कथा आणि उच्च दर्जाच्या निर्मितीला पसंती देतात. कोबेनच्या पुस्तकांच्या जगभरात लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत आणि त्याच्या साहित्यावर आधारित कलाकृती सातत्यानं यशस्वी ठरतंय.

सीरिजची कथा नेमकी काय?

‘आय विल फाइंड यू’ (I Will Find You) ही सीरिज केवळ ॲक्शन आणि थ्रीलनं भरलेली नाही, तर त्यात इमोशनल डेप्थही आहे. यात कुटुंब, विश्वासघात आणि सूड यांसारखे विषय अतिशय प्रभावीपणे मांडले गेले आहेत. सॅम वर्थिंग्टन यांच्याव्यतिरिक्त, या सीरिजमधील सहाय्यक कलाकारांनीही आपल्या भूमिकांना अतिशय समर्थपणे जिवंत केलंय.

या यशामुळे हार्लन कोबेन हे पुन्हा एकदा ‘स्ट्रीमिंग किंग’ म्हणून प्रस्थापित झालेत. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित सीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वात खात्रीशीर आणि लोकप्रिय आशयांपैकी एक आहेत. जर तुम्ही अजून ‘आय विल फाइंड यू’ (I Will Find You) पाहिली नसेल, तर ती पाहण्यासाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे. त्यामुळे स्पॉयलर्स न देता इतकंच सांगता येईल की, एकदा का तुम्ही ही सीरिज पाहायला सुरुवात केलीत, की ती पाहणं थांबवणं कठीण जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actress Life Story: कधीकाळी बॉलिवूड गाजवलं, पण लग्नानंतर सगळं सोडून संसाराला लागली; आज 120 कोटींच्या साम्राज्याची मालकीण, 700 लोकांना दिलाय रोजगार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *