July 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलै महिना नशीब पालटणारा! 5 राशींना मोठा धनलाभ, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य वाचा


July 2026 Monthly Horoscope: जून महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता जुलै (July 2026) महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा महिना ग्रह-नक्षत्रांच्या तुलनेने फार शुभ असणार आहे. जुलैचा संपूर्ण महिना नेमका कसा असेल? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आर्थिक, करिअर आणि वैवाहिक जीवनाबाबत जून महिना नेमका कसा असेल? आज आपणतूळ ते मीन राशींचं जुलै महिन्याचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत. 

तूळ रास (Libra July 2026 Monthly Horoscope)

तूळ राशींसाठी जुलै महिना भागीदारीच्या व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि अडकलेले पैसे मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा विचार करू शकता. मानसिक शांततेसाठी योग-ध्यानाचा लाभ होईल.

वृश्चिक रास (Scorpio July 2026 Monthly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी जुलै महिना कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल, पण तुमच्या कर्तृत्वामुळे यश मिळेल. व्यवसायात नवीन योजना फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबातील मतभेद शांततेने सोडवा. प्रेमसंबंधांमध्ये संयम ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब आणि तणावाकडे लक्ष द्या.

धनु रास (Saggitarius July 2026 Monthly Horoscope)

धनु राशींसाठी जुलै महिना नोकरीत प्रगती आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामांना गती मिळेल. व्यवसायात नफा वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल होतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मकर रास (Capricorn July 2026 Monthly Horoscope)

मकर राशीसाठी जुलै महिना करिअरमध्ये स्थिरता राहील आणि दीर्घकालीन योजनांना यश मिळेल. व्यवसायात जुने व्यवहार पूर्ण होतील. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. हाडे किंवा सांधेदुखीचा त्रास असल्यास काळजी घ्या.

कुंभ रास (Aquarius July 2026 Monthly Horoscope)

कुंभ राशींसाठी जुलै महिना नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरीत अपेक्षित प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. प्रेमजीवन आनंददायी राहील. आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल.

मीन रास (Pisces July 2026 Monthly Horoscope)

मीन राशीसाठी जुलै महिना यश मिळेल. नोकरीत कौतुक आणि नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल. आध्यात्मिक कार्यात मन रमल्याने मानसिक समाधान मिळेल.

हेही वाचा :

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा पूजेचा ‘हा’ शुभ मुहूर्त, फक्त ‘हे’ 2 तास टाळा! तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, पारंपारिक समजूत…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *