July 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जुलै म्हणजे भाग्योदयाची वेळ! 4 राशींचा गोल्डन टाईम, पैसा, नोकरी..मासिक राशीभविष्य


July 2026 Monthly Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, जून (May 2026) महिना संपून लवकरच आता जुलै (July 2026) महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना ग्रह-नक्षत्रांच्या तुलनेने फार शुभ असणार आहे. जुलैचा संपूर्ण महिना नेमका कसा असेल? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आज आपण मेष ते कन्या राशींचं जुलै महिन्याचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत. 

मेष रास (Aries July 2026 Monthly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिना तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा करार मिळू शकतात. आर्थिक बाजू मजबूत राहील, मात्र अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंधांत विश्वास वाढेल आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या दृष्टीने थकवा व डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. 

वृषभ रास (Taurus July 2026 Monthly Horoscope)

वृषभ राशीसाठी जुलै महिना करिअरमध्ये स्थिरता आणि यश मिळण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात गुंतवणुकीचे निर्णय फायदेशीर ठरू शकतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील एखादा शुभ प्रसंग आनंद देईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे.

मिथुन रास (Gemini July 2026 Monthly Horoscope)

मिथुन राशीसाठी जुलै महिना कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि मेहनतीचे कौतुक होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. प्रेमजीवनात संवाद वाढल्याने गैरसमज दूर होतील. प्रवासाचे योग असून आरोग्य सामान्य राहील.

कर्क रास (Cancer July 2026 Monthly Horoscope)

कर्क राशीसाठी जुलैचा महिना कामाचा ताण वाढला तरी संयम ठेवल्यास यश मिळेल. व्यवसायात जुन्या अडचणी दूर होतील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. पोटाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहारावर लक्ष द्या. 

सिंह रास (Leo July 2026 Monthly Horoscope)

सिंह राशीसाठी जुलै महिना करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. व्यवसायात विस्तारासाठी अनुकूल काळ आहे. आर्थिक लाभामुळे आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्य चांगले राहील, मात्र पुरेशी विश्रांती घ्या.

कन्या रास (Virgo July 2026 Monthly Horoscope)

कन्या राशीसाठी जुलैचा महिना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. व्यवसायात नियोजनबद्ध काम केल्यास नफा मिळेल. बचतीवर भर द्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्वचा किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास संभवतो.

हेही वाचा :

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा पूजेचा ‘हा’ शुभ मुहूर्त, फक्त ‘हे’ 2 तास टाळा! तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, पारंपारिक समजूत…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *