Last Updated:
Nikhil Chaudhary Last Ball Six : कॅप्टन फाफ डुप्लेसिसने शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी वेस्ट इंडिजच्या अकील हुसेनवर सोपवली आणि इथूनच एका महानाट्याला सुरुवात झाली अन् एक दोन नाही तर तीन मोठ्या घटना घडल्या.
Washington Freedom vs Texas Super Kings : टीम इंडियाचा बॉलर अर्शदीर सिंग ओरडून ओरडून सांगत होता की निखील चौधरीला घ्या पण कोणत्याच फ्रँचायझीने रस दाखवला नाही. आता ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या या पठ्ठ्यानं मेजर लीग क्रिकेट 2026 मध्ये अशी काही कमाल केलीये की सर्वांना आश्चर्यानं तोंडात बोटं घातली आहेत. मेजर लीग क्रिकेट 2026 मधील वॉशिंग्टन फ्रीडम आणि टेक्सास सुपर किंग्स यांच्यातील सामन्याचा थरार शेवटच्या ओव्हरमध्ये शिगेला पोहोचला होता. यावेळी मुळ पंजाबच्या निखिल चौधरीने सिक्स मारून रोमांचक शेवट केला.
वॉशिंग्टन फ्रिडम संघाला विजयासाठी 6 बॉल्समध्ये केवळ 6 रन्सची गरज होती आणि हातामध्ये 4 विकेट्स शिल्लक होत्या. मैदानावरील परिस्थिती पाहता वॉशिंग्टन हा सामना सहज जिंकणार असेच वाटत होते. कॅप्टन फाफ डुप्लेसिसने शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी वेस्ट इंडिजच्या अकील हुसेनवर सोपवली आणि इथूनच एका महानाट्याला सुरुवात झाली अन् एक दोन नाही तर तीन मोठ्या घटना घडल्या.
अकील हुसेनने ओव्हरचा पहिला बॉल टाकला, ज्यावर मार्को यानसेनला एकही रन काढता आला नाही. यामुळे वॉशिंग्टनवरील दबाव वाढला. दुसऱ्याच बॉलवर अकीलने मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या यानसेनला थेट बाद केले. यानसेन आउट झाल्यानंतर मैदानात आलेला अपोन्सो देखील अकीलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि तिसऱ्या बॉलवर झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. सलग दोन विकेट्स पडल्यामुळे सामन्यातील रंजकतेमध्ये कमालीची वाढ झाली होती.
अकील हुसेन एवढ्यावरच थांबला नाही. त्याने चौथ्या बॉलवर आसिफ महमूदला देखील बाद करून मैदानावर खळबळ उडवून दिली. अकीलने शानदार हॅट्ट्रिक पूर्ण केली होती आणि वॉशिंग्टनने सलग तीन बॉल्सवर तीन विकेट्स गमावल्या होत्या. अचानक संपूर्ण सामना टेक्सास सुपर किंग्सच्या बाजूने झुकला होता. अकीलचा हा थरार नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा असलेला निखिल चौधरी अत्यंत जवळून पाहत होता, जो 18 बॉल्सवर 21 रन्स करून खेळत होता.
NIKHIL CHOUDHARY – THE HERO OF THE FINAL OVER
With Washington Freedom needing just 6 runs off the last 6 balls, the game looked all but over.But Nikhil Choudhary had other plans.
The MLC rookie delivered under pressure, defended the target and turned the match on its…
— Infinite Infos (@infiniteInfos) June 28, 2026
आता शेवटच्या दोन बॉल्सवर 6 रन्सची गरज असताना, ओव्हरच्या पाचव्या बॉलवर लॉकी फर्ग्युसनने कसाबसा 1 रन काढून स्ट्राईक निखिल चौधरीकडे दिली. समीकरण आता शेवटच्या बॉलवर 5 रन्स असे आले होते, म्हणजेच वॉशिंग्टनला जिंकण्यासाठी सिक्स मारणे अनिवार्य होते. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता, दोन्ही बाजूने प्रचंड दडपण निर्माण झाले होते.
शेवटच्या बॉलवर अकील हुसेन मॅच जिंकवून देणार की निखिल चौधरी चमत्कार करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अकीलने बॉल टाकताच, मूळ भारतीय असलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूने, म्हणजेच निखिल चौधरीने बॅटचा जोरदार प्रहार केला. त्याने मारलेला तो कडक सिक्स थेट सीमारेषेबाहेर गेला आणि अकील हुसेनने हॅट्ट्रिक घेऊन केलेल्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले. या एका सिक्ससह वॉशिंग्टन फ्रीडमने हा अशक्य वाटणारा विजय आपल्या नावावर केला.
Mumbai,Maharashtra
Nikhil Chaudhary : श्वास रोखणारी मॅच! 6 बॉलमध्ये 6 रन्सची गरज, बॉलरची हॅट्रिक, कॅमेरा फोडला अन् शेवटच्या बॉलवर सिक्स, अंगावर काटा येणारा Video
