Bigg Boss Winner Gaurav Khanna Divorce: लग्नाच्या 9 वर्षांनंतर बिगबॉस विजेत्या गौरव खन्नाचा संसार मोडला; भर कार्यक्रमात बायकोचा गौप्यस्फोट, वर्षभरापासून राहतायत वेगळे


Bigg Boss Winner Gaurav Khanna Divorce: बिग बॉसचा विजेता अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला (Akankasha chamola) लवकरच घटस्फोट घेणार आहेत.  फराह खान आणि रितेश देशमुख यांच्या ‘लॉक अप’ सीझन 2 मध्ये गौरवच्या बायकोने हा गौप्यस्फोट केला. या शोचा प्रीमियर पार पडला, या कार्यक्रमात तिने वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला. ती आणि गौरव खन्ना गेल्या वर्षभरापासून दोघे वेगळे राहत आहेत. आता आम्हाला विवाहित जोडप्याची ती भावना राहिली नाही. असं म्हणत दोघे वेगळे होणार असल्याचं सांगितलं. प्रीमियरमधील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. चाहत्यांना या बातमीमुळे मोठा धक्का बसलाय.दरम्यान, घटस्फोटाबद्दल सांगताना गौरवच्या बायकोने त्यांच्यात कोणतीही कटुता नाही आणि सर्व काही ठीक असल्याचंही स्पष्ट केलं. (Bigg Boss Winner Gaurav Khanna Divorce)

Gaurav Khanna Divorce:गेल्या वर्षभरापासून वेगळं राहतायत गौरव – आकांक्षा

‘लॉक अप 2’ शोमध्ये आपलं सीक्रेट उघड करताना आकांक्षा म्हणाली, “मी आणि गौरव घटस्फोट घेत आहोत. हो… आम्ही गेल्या एका वर्षापासून वेगवेगळे राहत आहोत आणि ही गोष्ट आम्ही सार्वजनिक केली नव्हती. पण हेच माझं सीक्रेट आहे.” त्यानंतर तिने सांगितलं की, हा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतला असल्याचंही ती म्हणाली..“हा आमचा एकत्रित निर्णय होता. गेल्या एका वर्षापासून आम्ही याबद्दल विचार करत होतो. माझ्या आणि गौरवच्या नात्यात कोणतीही कटुता नाही. अजूनही आम्ही एकमेकांशी बोलतो. पण आम्हाला वाटतं की पार्टनर म्हणून आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही, कारण भविष्यासंदर्भात आमचे विचार खूप वेगळे आहेत. दुर्दैवाने, ते भविष्य एकत्र नाही. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद किंवा एकमेकांबद्दल दुस्वास नाही.” असंही तिनं सांगितलं.

Gaurav Khanna Divorce:‘लग्न झालेल्या जोडप्यासारखी भावना राहिली नाही’

आकांक्षाने पुढे सांगितलं, “आमच्या पालकांना वाटत होतं की आम्ही फक्त काही काळासाठी वेगळे राहत आहोत, कारण नात्यातील गोष्टी सावरण्यासाठी कधी कधी थोडा स्पेस आवश्यक असतो. आम्ही एकमेकांशी बोलत होतो, कार्यक्रमांना एकत्र जात होतो, एकमेकांना साथ देत होतो आणि सगळं शेअर करत होतो. त्यामुळे सगळ्यांनाच वाटत होतं की सर्व काही पुन्हा ठीक होईल. पण लग्न झालेल्या जोडप्यासारखी ती भावना आता उरली नव्हती. मला वाटतं, आमच्या कुटुंबासाठीही ही मोठी बातमी असेल.”

ओटीटीवर स्ट्रीम झाला ‘लॉक अप’ सीझन 2

दरम्यान, ‘लॉक अप’ सीझन 2 आता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होतोय. या शोचं सूत्रसंचालन फराह खान आणि रितेश देशमुख करत आहेत. यामध्ये एकूण 15 स्पर्धक सहभागी झाले असून त्यात राम कपूर, पामला सेरेना, शिवांगी जोशी, धीरज धूपर, आकांक्षा चौधरी, योगेश रावत, श्रेया कालरा, सुनीता आहूजा, आकांक्षा चमोला, हर्षद चोप्रा, माधुरी ग्रोवर, वरुण यादव, सूफी मोतीवाला, रियाझ अली आणि श्रेष्ठा अय्यर यांचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *