Horoscope Today 28 June 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल; वाचा आजचे राशीभविष्य


Horoscope Today 28 June 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 28 जून 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

तुमच्या तापट स्वभावानुसार समोरच्याला बोलायचं धाडस होणार नाही कोणतेही काम करताना तुमचा अहंकार इतरांना जाणवेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

दुसऱ्याच्या मताशी सहजासहजी तुम्ही सहमत होणार नाही पण शब्द हे शस्त्र आहे याची जाणीव ठेवायला लागेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मानसिक अस्थिरता जाणवेल या सर्व परिस्थितीमध्ये शांत राहण्यासाठी उपासना मार्गाचा अवलंब केल्यास फायद्याचे ठरेल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

तुमच्या चौकस स्वभावामुळे अनेक ठिकाणच्या बातम्या मिळवाल ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कामांमध्ये करता येईल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

कलाकारांच्या जीवनात स्फूर्तीदायक घटना घडतील गुणशास्त्र मंत्रशास्त्र विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना पोषक ग्रहमान आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आज तुमच्या पुढे कोणी आवाज उठवू शकणार नाही लेखकांना परखडलेखन करण्यासाठी काय चांगला आहे. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

घरामध्ये हलकेफुलके आणि प्रेमळ वातावरण राहील घरात पाहुण्यांची ये जा राहील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

आज मुलांची पटणे कठीण वाटते दोन पिढ्यांमधील अंतर तुम्हाला चांगलेच जाणवेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

स्थावर इस्टेटचे प्रश्न रखडतील महिला कुटुंबातील व्यक्तींसाठी कष्ट करण्यात धन्यता मानतील. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरी धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

तुमच्या बरोबरच्या लोकांचे सहकार्य तुम्हाला उत्तम मिळेल परंतु याचा लाभ पदरात पडण्यासाठी झगडावे मात्र लागणार आहे.

मीन रास (Pisces Horoscope Today)

दुसऱ्या मधील अवगुण शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या गुणांचा विकास करण्यावर भर द्यावा लागेल.

वाचा महत्त्वाच्या बातम्या :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा चांगला की वाईट? 6 पैकी 3 राशी ठरतील लकी, साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *