TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  


TET Paper Leak  परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यात उद्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, भिवंडीत पेपर फुटल्याच्या संशयावरुन उद्या होणारी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. टीईटी परीक्षेची नवी तारीख येत्या दोन तीन दिवसांमध्ये जाहीर करु, असं देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आलं आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थी शिक्षकांनी टीईटीचा पेपर फुटल्यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. 

परभणीतील परीक्षार्थी काय म्हणाले? 

अगोदर आमच्या मुलांना नीटची परीक्षा द्यायची होती, त्यांचेही पेपर फुटले. आता आम्हाला TET द्यायची होती त्या परीक्षेचे ही पेपर फुटलेत. आम्ही नेमकं करायचं काय? सततच्या पेपरफुटी मुळे आमचे सर्वच कुटुंब डिप्रेशन मध्ये जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.सरकारनं या पेपर फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी  तसेच वारंवार पेपर का फुटत आहेत?, असा सवाल देखील शिक्षकांनी केला.

पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. शासनानं प्रत्येक पेपर फुटतोय त्याकडे लक्ष द्यावं, असं परीक्षार्थींनी म्हटलं आहे.   

दादा भुसे काय म्हणाले?

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी टीईटी परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काळजी घेतलेली होती, असं म्हटलं. संशयितांकडून मिळालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये साम्य आढळले आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीरपणे नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या चौकशीत ज्या काही बाबी समोर येतील, त्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं देखील दादा भुसे यांनी सांगितलं.   

परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. 28 जून 2026 रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)  पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 27 जूनला  पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली.  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) जून 2026 च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने उद्या होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे. टीईटी परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *