Eknath Shinde on Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानाने प्रवास केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी या भेटीवर सूचक विधान करत “मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय चर्चा झाली असून त्याचे तपशील लवकरच समोर येतील,” असा दावा केला होता. आता ठाकरेंच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आक्रमक शब्दांत पलटवार केला असून उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.
Eknath Shinde on Uddhav Thackeray: नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले की, “विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं. त्यामुळे 2019 ला जी बेईमानी केली, महाराष्ट्राच्या जनतेने एकाच विमानातून प्रवास करण्याचे तिकीट दिले होते. परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला. आता ते गटांगळ्या खात सुटले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस हे खूप हुशार आहेत. त्यांनी 2019 ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेले आहे,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray:नेमकं विमानामध्ये काय घडलं होतं?
दरम्यान, शुक्रवारी (26 जून) सायंकाळी 6:30 वाजताच्या इंडिगोच्या (IndiGo) मुंबई-नागपूर विमानाने दोन्ही नेते प्रवास करत होते. उद्धव ठाकरे आपल्या पक्ष सोडलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात दौरा करण्यासाठी निघाले होते, तर देवेंद्र फडणवीस पुण्याचा कार्यक्रम आटपून नागपूरला जात होते. विमानामध्ये प्रवेश करत असताना देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची समोरासमोर भेट झाली.
त्यावेळी समोर बघून देवेंद्र फडणवीस मिश्कीलपणे म्हणाले, “आपण तिघे एकत्रित आलो, हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे.” या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी केवळ एकमेकांची औपचारिक विचारपूस केली. पूर्ण विमान प्रवासात कोणतीही राजकीय किंवा वैयक्तिक चर्चा झाली नाही. विमान नागपूरला पोहोचल्यानंतर एकमेकांना निरोप देऊन दोन्ही बाजूंचे नेते आपापल्या मार्गाने निघून गेले.
Uddhav Thackeray: ठाकरेंच्या दौऱ्याची पार्श्वभूमी
ठाकरे सेनेतील 6 खासदारांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या त्या लोकसभा मतदारसंघाचा डॅमेज कंट्रोल दौरा करण्याचे निश्चित केले आहे. आज 27 जून रोजी त्यांच्या यवतमाळ-वाशीम दौऱ्याची सुरुवात झाली आहे. मात्र, या दौऱ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या विमान प्रवासाने आणि त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या खरपूस समाचाराने राज्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!