India vs Ireland 2nd T20 Playing 11 Update : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर आता भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष 28 जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यावर लागले आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारतावर 34 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय संघात मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, सर्वांचे लक्ष 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या पदार्पणाकडे लागले आहे. दुसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग-11 मध्ये संजू सॅमसनच्या जागी वैभवला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची उत्सुकता (Vaibhav Sooryavanshi IND vs IRE 2nd T20 Playing 11)
आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 776 धावा ठोकणाऱ्या आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग-11 मध्ये जागा मिळाली नव्हती आणि त्याने 12 वा खेळाडू म्हणून मैदानावर पाणी आणण्याचे काम केले होते. मात्र, भारताच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आणि माजी क्रिकेटपटूंच्या दबावानंतर कर्णधार श्रेयस अय्यर दुसऱ्या सामन्यात या वंडर बॉयला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची कॅप देऊ शकतो. वैभवने पदार्पण केल्यास तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून भारतासाठी खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरेल.
संजू सॅमसनला डच्चू की विश्रांती? (Sanju Samson IND vs IRE 2nd T20 Playing 11)
पहिल्या टी-20 सामन्यात सलामीला आलेल्या संजू सॅमसनला स्वस्तात बाद झाला. आयर्लंडच्या नवख्या गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी ढेपाळली. सॅमसनच्या सातत्य नसलेल्या कामगिरीमुळे संघ व्यवस्थापन आता दुसऱ्या सामन्यात बदल करण्याच्या विचारात आहे. वैभव सूर्यवंशी डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज असल्यामुळे, संजू सॅमसनला प्लेइंग-11 मधून बाहेर बसावे लागू शकते. त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशन यष्टीरक्षणाची धुरा सांभाळेल.
पहिल्या सामन्यात संजू आणि अभिषेकने सलामी दिली होती, पण पराभवानंतर संघात आक्रमकता आणण्यासाठी वैभव सूर्यवंशीसारख्या फॉर्मात असलेल्या डाव्या हाताच्या फलंदाजाची गरज आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी आणि अब्रू वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. अशा स्थितीत युवा वैभव सूर्यवंशीचा संघात होणारा प्रवेश भारतीय फलंदाजीला नवी ऊर्जा देईल, अशी चाहत्यांना आशा आहे.
दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग-11 (IND vs IRE 2nd T20 Playing 11) : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला