रेल्वे फाटक उचलणारा राजू बनला DSP, 12 तास काम, कोचिंगशिवाय क्रॅक केली एक्झाम! | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

प्रत्येक यशाच्यामागे संघर्षाची मोठी कहाणी लपलेली असते, राजूची कहाणीही हिच जिद्द सांगत आहे. परिस्थितीने राजूला अनेकदा तोडण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो जिद्दीने उभा राहिला.

रेल्वे फाटक उचलणारा राजू बनला DSP, 12 तास काम, कोचिंगशिवाय क्रॅक केली एक्झाम!
रेल्वे फाटक उचलणारा राजू बनला DSP, 12 तास काम, कोचिंगशिवाय क्रॅक केली एक्झाम!

मुंबई : प्रत्येक यशाच्यामागे संघर्षाची मोठी कहाणी लपलेली असते, राजूची कहाणीही हिच जिद्द सांगत आहे. परिस्थितीने राजूला अनेकदा तोडण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो जिद्दीने उभा राहिला. वडिलांच्या निधनानंतर राजूने जबाबदारी सांभाळली. सगळ्यात आधी त्याने रेल्वेमध्ये पॉईंट्समनची नोकरी मिळवली, पण त्याचं स्वप्न ऑफिसर बनायचं होतं, त्यामुळे त्याने नोकरी करूनही BPSC परिक्षेची तयारी सुरू केली.

रेल्वे फाटक उचलण्याचं आणि ट्रेनच्या पॉईंट्सना जोडण्याचं काम ही 12 तासांची नोकरी राजू करत होता. कोणताही कोचिंग क्लास न लावता त्याने BPSC एक्झाम क्रॅक केली आणि आता तो डीएसपी बनला आहे.

12व्या वर्षी वडिलांचं निधन

राजू कुमार बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी आहे. 12व्या वर्षीच राजूच्या वडिलांचं निधन झालं, त्यामुळे कुटुंब संकटात सापडलं. घरातली आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे राजूला शहरातल्या महागड्या कोचिंग क्लासमध्ये ऍडमिशन घेणंही शक्य नव्हतं, पण तरीही त्याने हिंमत हरली नाही. रोजच्या आव्हानांचा सामना करताना राजूने अभ्यासाला सुरूवात केली.

वडिलांच्या निधनानंतर राजूची आईच त्याची सगळ्यात मोठी ताकद आणि प्रेरणा होती. कठीण परिस्थिती असतानाही तिने राजूला अभ्यास करण्यासाठी प्रेरित केलं. यानंतर राजूने कॉम्पिटेटिव्ह परिक्षांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. आपल्या पहिल्याच प्रयत्नात राजूला रेल्वेच्या ग्रुप-डी मध्ये नोकरी मिळाली. यानंतर त्याचं पोस्टिंग पॉईंट्समन म्हणून झालं, जवळपास 5 वर्ष त्याने रेल्वेमध्ये नोकरी केली.

रेल्वेमध्ये 12 तासांची नोकरी, त्यानंतर परिक्षेची तयारी

राजू रोज ड्युटीवर लेव्हल क्रॉसिंग गेट ऑपरेट करायचा, म्हणजेच रेल्वे फाटक उचलण्याचं काम राजूला मिळालं. रेल्वे क्रॉसिंगवरची भीषण गर्मी आणि मुसळधार पावसात राजू रोज 12-12 तास काम करायचा यानंतर तो BPSC परिक्षेसाठी अभ्यास करायचा.

BPSC परिक्षेमध्ये 72वा क्रमांक

राजूने बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या 70व्या परिक्षेमध्ये 72वा क्रमांक मिळवला, यानंतर त्याची डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच डीएसपी म्हणून निवड झाली आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, जिद्द, प्रयत्न आणि चिकाटी असेल तर यश तुम्हाला मिळतंच, हे राजूने दाखवून दिलं आहे.

मराठी बातम्या/देश/

रेल्वे फाटक उचलणारा राजू बनला DSP, 12 तास काम, कोचिंगशिवाय क्रॅक केली एक्झाम!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *