तुम्हाला काय वाटतं वर दोन गुजराती बसले म्हणून काही करू शकता? आमच्या नादाला… राज ठाकरेंचा जैन समाजाच्या शिष्टमंडळाला इशारा – Marathi News | Jain community met MNS chief Raj Thackeray at his residence


नुकताच मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली. यावेळी काही पदाधिकारीही उपस्थित होते. जैन समाजाच्या पांढऱ्या पट्ट्यावरून राजकारण तापत आहे. यादरम्यानच जैन समाजाकडून राज ठाकरे यांची भेट घेण्यात आली. तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून विनाकारण वाद निर्माण करत असल्याचे राज ठाकरे यांनी जैन समाजाला म्हटले. राज ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका तुमची डोकी भडकवली जात आहे, आमची डोकी भडकली तर केवढे होईल. तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात… विनाकारण वाद निर्माण करत आहात. इतकी वर्ष लोक राहत आहे. इतकी गुजराती लोक राहत आहेतस पूर्वीपासून राहत आहेत.

आताच कसे सुरू झाले गेल्या 10-12वर्षात. तुम्हाला काय वाटत आहे की, वर दोन गुजराती बसले आहेत तर काही करू. कापड टाका पांढरे पट्टे कसले मारत आहे. समोरच्यांच्या गोष्टी समजून घ्या. व्यापारी लोक आहात व्यापार करा शांत जगा. आजपर्यंत कोणी अडवले आहे का ? जैन पंत माझ्या घरी येऊन गेले… तुमच्या समाजातील लोकांना समजून सांगा, असेही राज ठाकरे यांनी यादरम्यान म्हटले.

काही भागात जैन धर्मियांकडून पांढरे पट्टे सार्वजनिक जागांवर मारले जात होते. याच विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली. ज्यानंतर मालाडमधील जैन समाजाचे लोक राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. यावेळी राज ठाकरेंकडून जैन समाजाला समजवण्यात आले, यासोबतच आक्रमक भूमिका घेत त्यांनी थेट सुनावले. अगोदरही जैन मुनी सोसायट्यांमध्येत जात पण त्यावेळी अशाप्रकारच्या पांढऱ्या पट्या मारल्या जात नव्हता.

मग आता का मारल्या जात आहेत? असाही प्रश्न राज ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. या भेटीचे फोटोही पुढे आली आहेत. राज ठाकरे आपली स्पष्टपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. मनसेकडून अगोदरच या प्रकरणात आक्रमक भूमिका घेण्यात आली. आता थेट समोरासमोर बसून राज ठाकरे आणि जैन समाज चर्चा करताना दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *