Supergirl Trailer: अँटी हिरो सुपरगर्ल – इम्पर्फेक्ट सुपरनॅच्युरल



Supergirl Movie Trailer: डिसी युनिव्हर्सची सुपरगर्ल (Supergirl Movie) आलीय. काराकडे (मिली अलकॉक) सुपर पॉवर आहे. पण ती आळशी आहे. ती राहत असलेल्या क्रिप्टॉन प्लॅनेटचा नाश तिने पाहिलाय. आई-वडील गमावलेत. याचा ट्रॉमा आहे. सतत हँगओवरमध्ये असते. उतावळी आहे. डोक्यात राग आहे. थोडक्यात काय तर ती मेसी, अस्वच्छ आणि एटिट्यूडमध्ये राहणारी एक अँटी हिरो आहे. तिला तिच्या सुपर पॉवरची जाण आहे. पण ती वापरण्याचाच कंटाळा आहे. तिचा भाऊ सुपरमॅन तिकडे पृथ्वीवर जग वाचवतोय, ही इकडे वेगळ्या प्लॅनेटवर हँगओवरमध्ये पडलीय. अशा या काराला रुथ भेटते. मग ती खऱ्या अर्थाने सुपरगर्ल बनते. 

Supergirl Trailer: अँटी हिरो सुपरगर्ल - इम्पर्फेक्ट सुपरनॅच्युरल

रुथची गोष्टही कारासारखीच. क्रुरकर्मा ब्रिग्रांट दरोडेखोरांनी तिचं कुटुंब संपवलंय. तिला याचा बदला घ्यायचाय. त्यासाठी  काराची मदत हवेय. मनात नसतानाही काराला रुथला सोबत घ्यावं लागतं. तिची पाठराखण करावी लागते. दोघींचं दुःख सारखंच आहे. त्यांचं कुटुंब संपलंय. त्यांची सॉलिड टीम होते. आता ते ब्रिगांटचा सामना करायला तयार आहेत. 

Supergirl Trailer: अँटी हिरो सुपरगर्ल - इम्पर्फेक्ट सुपरनॅच्युरल

डिसी युनिव्हर्सची सुपरगर्ल (2026) अनेक अर्थानं वेगळी आहे. दिग्दर्शक क्रेग गिलेस्पी तिला सुपर नॅच्युरल बनवत नाही. तो तिला एक सर्वसाधारण मुलगी म्हणूनच प्रेक्षकांसमोर आणतो. ती सुपरमॅनसारखी परफेक्ट नाही. मुळात महिलांना परफेक्ट असायची गरजच नाही, तरीही त्या सुपर हिरो बनू शकतात, असा संदेश देत क्रेग गिलेस्पी सुपरगर्ल काराला जेन झी आणि जेन अल्फाशी जोडून दिलंय. 

सुपरगर्ल सिनेमा स्पेशल इफेक्टचा जबरदस्त अविष्कार आहे.हा एक परफेक्ट आयमॅक्स एक्सपेरियन्स देणारा सिनेमा आहे. क्रेग गिलेस्पीनं भविष्यातलं युनिव्हर्स तयार केलंय. एका ग्रहावरुन दुसऱ्या ग्रहात जाताना पडद्यावर होणारा चमत्कार हा आयमॅक्समध्येच अनुभवण्यासारखा आहे. 

Supergirl Trailer: अँटी हिरो सुपरगर्ल - इम्पर्फेक्ट सुपरनॅच्युरल

सुपरगर्लची तुलना वंडर वुमनसोबत होणं सहाजिकच आहे. वंडर वुमन आत्मविश्वासू आणि शांत आहे. ती अगदी परफेक्ट आहे. पण सुपरगर्ल आळशी आणि उतावळी आहे. पण आपल्याला नक्की काय करायचंय आणि काय नाही याची जाणिव तिला जास्त आहे. उगाच तिच्याकडून अपेक्षा ठेवू नका. पण तिच्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करुन चालणार नाही. रुथ आणि सुपरगर्ल कारा एकमेकांना सांभाळत, एकमेकांच्या मदतीनं अनेक मुलींना वाचवतात आणि मग त्या मुली स्वतः सक्षम होतात. असा थेट फेमिनिस्ट विचार सुपरगर्ल देते. 

लोक जेन झीकडे नॉनसिरीयस पिढी म्हणून पाहतात. भले ते परफेक्ट नसतील, आळशी असतील. जगाकडे बघण्याचा त्याचा त्याचा दृष्टिकोन असतो. पण ते मनातून हळवे असतात. त्यांना नाती जास्त समजतात. ती नाती ते आपआपल्या पध्दतीनं जपतात. टिकवतात. नाहीच जमलं तर सहज सोडून देतात. लोड घेत नाहीत. हे सर्व सुपरगर्लमध्ये दिसतं. म्हणूनच ती आजची प्रतिनिधी आहे. इम्पर्फेक्ट सुपरनॅच्युरल!!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *