मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही..; आमदार अभिमन्यू पवारांचा टोमणा, मेधा कुलकर्णी भर कार्यक्रमातून निघून गेल्या


पुणे : भाजप खासदार आणि आमदार यांच्यातील राजकीय नाराजीनाट्य पुण्यातील (Pune) कार्यक्रमातून दिसून आले. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युपीएससी, एमपीएससी उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्यावरुन नाराजीनाट्य पाहायला मिळालं. मात्र, आमदार अभिमन्यू पवार यांनी खासदार मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांना टोमणा मारल्याने त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. 

खासदार मेधा कुलकर्णी यांना कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून अभिमन्यू पवार यांनी टोमणा मारला. मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही म्हणताच मेधा कुलकर्णींनी रागात कार्यक्रम सोडला, त्या भर कार्यक्रमातून निघून गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे, राजकीय वर्तुळात आणि कार्यक्रमस्थळी या घटनेची चांगलीच चर्चा रंगली. 

हेही वाचा

नाशिक विधानपरिषदेचा निकाल शिंदेंना 4 दिवस आधीच माहीत होता? आमदार गोकुळ गीतेंच्या दाव्याने खळबळ; म्हणाले, ‘महायुतीत मिठाचा खडा नको म्हणून…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *