Prakash Abitkar: शिवसेनेकडे आमदार खासदारांचा ओढा वाढलाय, येणाऱ्या काळात अनेकजण शिवसेनेमध्ये येतील; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचं सूचक वक्तव्य


Prakash Abitkar: शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर राज्यभरातील लोकप्रतिनिधी यांचा विश्वास आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडे आमदार खासदारांचा ओढा वाढला आहे. येणाऱ्या काळात अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतील, असं सूचक वक्तव्य आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. आज (26 जून) राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आल्यानंतर प्रकाश आबिटकर यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आहे. शाहू महाराज यांच्या विचाराचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. कोल्हापूरपासून देशापर्यंत शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेतली जाते.

बोलताना काही मर्यादा पाळल्याच पाहिजेत

शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी मुजोरीवर बोलताना ते म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बोलताना काही मर्यादा पाळल्याच पाहिजेत. अनावधानाने घडलेल्या घटनेबद्दल संजय दिना पाटील यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे. याबाबत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. रुग्णवाहिकांच्या कमतरतेवरून बोलताना त्यांनी सांगितले की, आरोग्य विभाग, महानगरपालिका, एनएचएआय यांच्या रुग्णवाहिकेचे काम व्यवस्थित सुरू आहे. प्रश्न केवळ योग्य ठिकाणी योग्य रुग्णवाहिका असणे याबाबत आहे. तातडीने रुग्णवाहिका मिळाली पाहिजे याबाबत समन्वयांवर काम करणे गरजेचं आहे. ते काम योग्य पद्धतीने झाल्यानंतर कुठेही अडचण येणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. 

आमदार राजेश क्षीरसागर राज्यात टपऱ्या टपऱ्यांवर गांजा मिळत असल्याचे विधानसभेत म्हटले होते. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण नशा मुक्त अभियान सुरू केलं आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. ही समस्या संपूर्ण राज्यभर आणि देशभर आहे, कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अंमली पदार्थ खपवून घेतला जाणार नाही, येणाऱ्या काही दिवसांमध्ये यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितलं. 

महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत

गोकुळ निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले की, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. काल हसन मुश्रीफ साहेब यांनी त्यांचे ठराव सादर केले आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने यासाठी प्रयत्न करत राहणार आहे त्यामध्ये काहीही गैर नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *