Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा कसा असणार? 6 पैकी 2 राशींसाठी आठवडा धोक्याचा; साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 29 June To 5 July 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जूनचा महिना संपून लवकरच जुलैचा महिना सुरु होणार आहे. येणारा नवीन महिना कसा असेल तसेच, जुलै महिन्याचा पहिला आठवडा नेमका कसा जाणार आहे. याबाबत अनेकांना उत्सुकता असते. नवीन आठवडा 29 जून ते 5 जुलै 2026 असा असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण तूळ ते मीन राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात. 

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी जुलैचा पहिला आठवडा लाभदायी ठरणार आहे.  या काळात तुम्हाला काही निर्णय स्वत: घ्यावे लागतील. तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित राहील. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर हा कालावधी तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा परिवर्तनाचा, आत्मविश्वासाचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. तसेच, खऱ्या-खोट्याची जाण तुम्हाला होईल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच,धार्मिक कार्यात तुमची गोडी जास्त वाढेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. 

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. या काळात तुमच्यात सकारात्मक विचारसरणी असेल. नवा दृष्टीकोन तुमचा इतरांना दिसेल. तसेच, या आठवड्यात प्रवासाचे योगदेखील जुळून येणार आहेत. तुमच्या ध्येयावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. सरकारी योजनांचा लाभ घ्याल. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला जास्त प्रवास करावा लागू शकतो. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी जुलैचा पहिला आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. नवीन कार्य हाती घेण्यास तुम्ही सक्षम असाल. तसेच, उत्पन्नाची अनेक नवीन साधनं तुमच्यासमोर निर्माण होतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना पगारवाढीची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवड्याची सुरुवात शुभकारक असणार आहे. तुमच्यातील सकारात्मक दृष्टीकोन या काळात दिसेल. तसेच, या कालावधीत तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात देखील करु शकता. मित्रांबरोबर भेटीगाठी वाढतील. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Horoscope Today 26 June 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी ‘या’ 8 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *