Indrajaal First Look: रहस्य, थरार, पौराणिक कथा आणि गुप्त खजिन्याचा शोध याचा एक अनोखा संगम असलेला ‘इंद्रजाल’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेला हा चित्रपट भारतीय पौराणिक कथांमधील निळावंतीशी संबंधित गूढ रहस्य आणि जंगलातील रोमांचक साहसावर आधालेला सिनेमॅटिक असा हा चित्रपट प्रत्येकाला खिळवून ठेवणारा आहे. ‘शिवरत्न प्रॉडक्शन’ने नुकतीच ‘इंद्रजाल’ या त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली. आता या चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि फर्स्ट लूक समोर आलं असून ते सिने-रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढवणारं आहे.
दमदार कलाकारांची फळी
‘इंद्रजाल’ हा सिनेमा सौ. सुचेता अजय निकम यांच्या ‘शिवरत्न प्रॉडक्शन’ची पहिली निर्मिती आहे. तसेच अजय निकम आणि मंगेश वैती हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे यांनी सांभाळली आहे. यापूर्वी त्यांनी ‘ढ लेकाचा’, ‘रेष्टीभ’ आणि ‘कुलस्वामिनी’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. जमिनीशी जोडलेले, भावपूर्ण आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कथा मांडण्यासाठी ओळखले जाणारे हे दिग्दर्शक ‘इंद्रजाल’मार्फत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत महेश निकम, शनाया त्रिपाठी, यशराज डिंबळे, किरण माने, कल्पना सारंग, नामदेव मुरकुटे यांसोबत दर्शना रसाळ, धीरज शर्मा, सत्यम छेत्री, राहुल कुलकर्णी, संजना देशमुख, कल्पेश जगताप, लक्ष्मी विभुते आणि योगेश दांगट या सहकलाकारांच्या दमदार भूमिका आहेत.
कधी होणार प्रदर्शित?
चित्रपटाबाबत बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे म्हणाले, “‘इंद्रजाल’ या चित्रपटाद्वारे मी थरारनाट्य-रहस्यासोबत ओघवती कथाकथन शैली यांचा मेळ घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. माझ्या कल्पनाशक्तीवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि या चित्रपटासाठी आपले सर्वस्व पणाला लावून काम केल्याबद्दल मी निर्मात्या सौ. सुचेता अजय निकम आणि माझ्या संपूर्ण टीमचा अत्यंत ऋणी आहे”.तसेच या चित्रपटाचा प्रमुख अभिनेता महेश निकम म्हणाला,- इंद्रजालसारख्या भव्य हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका मिळणे हे कोणत्याही अभिनेत्यासाठी एक स्वप्नं असू शकते. या चित्रपटाचे चित्रीकरण करतांना, भूमिकेशी समरस होतांना मला मोठं आव्हान असायचं म्हणूनच तिथला प्रत्येक दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. आता 24 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यावर कधी एकदा प्रेक्षक इंद्रजालच्या जादूचा रोमांचक अनुभव घेतील याची मी आतुरतेने वाट पाहतोय”.
या चित्रपटाच्या छायांकनाची धुरा आकाश सेठी यांनी सांभाळली आहे. तर ‘इंद्रजाल’चे लेखन राज्य पुरस्कार विजेते लेखक नामदेव मुरकुटे यांनी केले आहे. चित्रपटाच्या संगीताची जादू गौरव चाटी यांची असून, गीत लेखन योगेश दांगट यांचे आहे. पार्श्वसंगीत उदय साळवी यांचे असून, वेशभूषा जान्हवी शिंदे यांनी सांभाळली. तर निर्मिती रचना सचिन पाटील, सर्जनशील निर्मिती हरेश प्रेमपरम सुतार आणि विक्रमसिंह चव्हाण यांची तर कार्यकारी निर्मिती अशोक केंद्रे यांनी केली आहे. ‘ऑगस्ट एंटरटेनमेंटद्वारे प्रदर्शित होणारा ‘इंद्रजाल’हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष