ऑपरेशन टायगरनंतर आता काँग्रेसला मोठा धक्का; राजकारणात घडामोडींना वेग, मोठी बातमी समोर – Marathi News | BIG blow to Congress Congress leader Prakash Sable joins Yuva Swabhiman Paksha


काँग्रेसला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी

शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी मोठी फूट पडली, 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंड केलं आहे. या सर्व सहा खासदांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानं शिवसेना शिंदे गटाची राज्यात ताकद चांगलीच वाढली आहे. आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांची एकूण संख्या 13 वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडे आता केवळ 3 खासदारचं उरले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान त्यापूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता, एकनाथ शिंदे यांच्या उठवानंतर शिवसेना पक्षात उभी फुट पडल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी अनेक आमदार आणि खासदार यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती.

एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसरा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला, तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता. त्यानंतर ऑपरेशन टायगर सक्सेसफूल झाल्याचं शिंदे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरनंतर आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, अमरावतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. हा काँग्रेसला जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान प्रकाश साबळे यांनी युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी पक्ष सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा काँग्रेससाठी अमरावतीमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *