Madhavan : पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर माधवनने महाराष्ट्र सरकारचे आभार का मानले? – Marathi News | Actor r madhavan thaks to Maharashtra govt for recomanding his name to padma shri awards 40 lakh rupee special editon watch


अभिनेता आर माधवनला नुकतचं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 23 जून रोजी राष्ट्रपती भवनात माधवनला या पुरस्काराने सन्मानित केलं. चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी माधवनला हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना माधवनचा पेहराव चर्चेचा विषय तर ठरलाच. पण त्याच्या मनगटावरील घड्याळालाही सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळाली. घड्याळाची चर्चा यासाठी कारण माधवने या खास प्रसंगी लिमिटेड एडिशन घड्याळ हातावर बांधलं होतं. त्याची किंमत 40 लाखाच्या घरात आहे. माधवनच्या घड्याळाच्या किंमतीने सर्वांनाच हैराण करुन सोडलय. या घड्याळाच वैशिष्ट्य ऐकून तुम्ही सुद्धा कौतुक कराल.

आर माधवनच्या या 40 लाखाच्या घड्याळाच वैशिष्ट्य म्हणजे त्यात 18 कॅरेट रोज गोल्ड केस, मार्बल डायलवर एक मिनिएचर पेंटिंग आहे. जयपूरचा हवा महल त्यावर आहे. हे एक लिमिटेड एडिशन घड्याळ आहे, ज्याची किंमत 40 लाख रुपये आहे. सगळ्या जगात या घड्याळाचे फक्त 10 पीस उपलब्ध आहेत. त्यातील एक माधवनकडे आहे. हे घड्याळ Titan nebula jalsa रेंजच आहे.

हा पु्रस्कार नेहमी माझ्या स्मरणात राहील

पुरस्कार स्वीकारल्यानंतर माधवनने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. “पद्म श्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनता विनम्रतेची आणि कृतघ्नतेची भावना आहे. खरच सन्मानित झाल्यासारखं वाटतय. देशातील सर्वात मोठ्या नागरिक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल माधवनने भारत सरकारचे आभार मानले. माझं नाव सुचवलं, माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून त्याने महाराष्ट्र सरकारचे सुद्धा आभार मानले. हा पु्रस्कार नेहमी माझ्या स्मरणात राहील. ज्यांनी माझे चित्रपट पाहिले, माझ्या भूमिका स्वीकारल्या, माझ्या यशाचं सेलीब्रेशन केलं, माझ्या कमतरता माफ केल्या, इतकी वर्ष माझ्यासोबत राहीले, हा पुरस्कार जितका माझा आहे तितकाच तुमचा सुद्धा आहे. तुमच्या प्रेमानेच मला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे” अशा शब्दात माधवनने पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *