Last Updated:
या चिमुरड्या मुलाने वर्गात २३ वर्षांच्याा चिमुरड्याला मारहाण केला. पाठीवर चावा घेतला. धक्कादायक म्हणजे, वर्गामध्ये त्यावेळी कुणीही नव्हतं.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहे, आपल्या लेकराची पहिली शाळा म्हणून पालक त्याला प्रायमरी स्कुलमध्ये टाकतात. जिथे या चिमुरड्याला खेळत खेळत शिकवलं जातं. पण, छत्रपती संभाजीनगरमधील एका प्री स्कुलमधून एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. वर्ग मित्र असलेल्या चिमुरड्याने आपल्याच वर्ग मित्राला अमानुषपणे मारहाण केली. एवढंच नाहीतर पाठीवर एक नव्हे तर 17 ठिकाणी चावा घेतला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिडको परिसरात असलेल्या फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूलमध्ये ही घटना घडली. 23 महिन्याच्या विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील एका चिमुरड्या विद्यार्थ्याने अमानुष मारहाण केली. शाळेतील दोन लहान विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आहे. या घटनेत एका 23 महिन्याच्या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. जेव्हा व्हिडीओ समोर आला तेव्हाा सगळ्यांना हादरा बसला.
छत्रपती संभाजीनगरमधील घटना, firstcry school सारख्या शाळेत एका २३ वर्षांच्या लहान मुलाला त्याच्या वयाच्या पोराने अमानुष केली मारहाण pic.twitter.com/4MYQNQbkMQ
— VIRALबाबा (@viralmedia70) June 25, 2026
या चिमुरड्याचे पालक मयूर बोरसे याच्या म्हणण्यानुसार, 22 जून रोजी शाळेतून मुलाला घरी आणल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर तसंच शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. याबाबत शाळा प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर सुरुवातीला समाधानकारक माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली असता टाळाटाळ करण्यात आल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर या प्रकरणी बालकाच्या सुरक्षित निष्काळजी केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात शाळेच्या प्राचार्य, सीईओ, मालक, रिजनल मॅनेजर, महाराष्ट्र हेड यांच्यासह इतर जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला असून त्यामध्ये दोन लहान मुलांमध्ये बराच वेळ वाद आणि झटापट सुरू असल्याचे दिसून आलं. या चिमुरड्या मुलाने वर्गात २३ वर्षांच्याा चिमुरड्याला मारहाण केला. पाठीवर चावा घेतला. धक्कादायक म्हणजे, वर्गामध्ये त्यावेळी कुणीही नव्हतं. जर वर्गाात मुलांची काळजी घेण्यासाठी कोणताही शिक्षक अथवा कर्मचारी तत्काळ हस्तक्षेप करताना दिसत नसल्याने शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूल शाळेविरोधात धक्कादायक बाबी समोर येत असून संबंधित शाळेकडे महापालिकेची आवश्यक परवानगी नाही. तसंच शिक्षण विभागाकडून शाळेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी शाळेच्या प्राचार्य, सीईओ, मालक, रिजनल मॅनेजर, महाराष्ट्र प्रमुख यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. तक्रारदार पालकांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, गुन्हा दाखल करू नये यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून 10 लाख रुपये आणि मुलाला तीन वर्षे मोफत शिक्षण देण्याचे आमिष दाखविण्यात आले. एवढेच नव्हे तर “तुम्ही आमचे काहीही वाकडे करू शकत नाही” अशा स्वरूपाची धमकीही दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
देशभरात एक हजारांहून अधिक शाखा असलेल्या या संस्थेविरोधातील आरोपांमुळे बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून शिक्षण विभाग आणि पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
