Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ, म्हणाले, ‘कॅमेरा बंद कर नाहीतर मी विसरुन जाईन मी खासदार आहे, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन’


Sanjay Dina Patil: उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर त्यांची साथ सोडून शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना आता पत्रकारांचे प्रश्नही बोचू लागले आहेत. राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी गुरुवारी शिवीगाळ केली. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा, अशी अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली.  (Maharashtra Politics news)

 काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटील यांनी, ‘माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन नाहीतर स्मशानात पाठवेन. आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत’, अशी फुशारकी मारली होती. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना त्यांची मुलगी आणि ठाकरे गटाची नगरसेविका राजुल पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परखड प्रश्न विचारणाऱ्यांना पत्रकारांसोबत संजय दिना पाटील यांनी गैरवर्तन केले. मी जे बोललोय ते खुलेआम बोललोय, माझ्यावर काय कारवाई करायची असेल तरी पोलीस करतील, मी कारवाई आणि चौकशीला तयार आहे, असे संजय दिना पाटील यांनी छाती ठोकून सांगितले. यावेळी संजय दिना पाटील हे  प्रसारमाध्यमांवरही संतापले. तुम्ही माईक माज्या तोंडासमोर कशाला ठरता, आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना, मग इकडे येता, कशाला हे सगळं करताय, असे बोलताना संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली.

माझा शिवसैनिकांसोबत कोणताही वाद नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही माझ्यावर उपकार आहेत. त्यांच्यामुळे मी खासदार झालो. जे नेते माझ्याविरोधात बोलत आहे, ते स्वत:ची सुरक्षा सोडून इकडे काही करायला येणार आहेत का? हे काही करणार, तेव्हा आम्ही मार खाऊन घ्यायचा का? हे लोक स्वत:च्या दादा लोकांकडून फोन करतात, सिक्युरिटीसाठी, ती केस पण दाबून टाकली. ती केस काढायला सांगा ना. मी संजय राऊत यांना खूप मानसन्मान दिलाय. 2004 मध्ये शिवसेनेच्या लीलाधार डाके यांच्याविरोधात मी निवडून आलो तेव्हा संजय राऊत यांनी मला मदत केली. किरीट सोमय्या यांच्याविरोधातही त्यांनी मला मदत केली होती. ही शिवसेनेविरोधात गद्दारी नव्हती का? मी आम्ही पाच लोकं मारली, जे बोललो ती घटना माझ्या जन्मापूर्वीची आहे. मला दहा लोकं लागत नाहीत, मी लोकांच्या मनावर राज्य करतो. शिंदे साहेबांनी माझ्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली नाही, उलट मला शाबासकी दिली. मी मर्द लोकांबरोबर गेलो आहे, मर्दांची कदर करतात, ते नाराजी व्यक्त करत नाहीत, शिंदे साहेबांनी मला शाबासकी दिली आहे, असे संजय दिना पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

Eknath Shinde and Sanjay Dina Patil: ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *