Gautami Patil  Item Song Video: गौतमी पाटीलचा ‘लागला ठसका, 440 चा झटका’; ‘लाईव्ह’मध्ये लावणीचा तडका असलेलं, प्रत्येकाला थिरकायला लावणारं आयटम सॉन्ग


Gautami Patil  Item Song Video: मराठी सिनेमांमध्ये (Marathi Movie) म्युझिकला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. याच कारणामुळे सुरेल गीत-संगीताची किनार असलेला मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. ‘लाईव्ह’ या आगामी मराठी सिनेमातही धमाकेदार गाण्यांची जोड देण्यात आलीय. मागील काही वर्षांपासून मराठीतही आयटम साँगचा ट्रेंड रुजला असून, ‘लाईव्ह’मध्ये एक वेगळ्या धाटणीचं आयटम साँग पाहायला मिळणार आहे. शीर्षकावरून या सिनेमात काय पाहायला मिळेल, याचा थांगपत्ता लागत नसल्यानं ‘लाईव्ह’बाबत कुतूहल वाढलंय. अशातच या सिनेमाला नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या ठसकेबाज गाण्याचा तडका देण्यात आल्यानं ‘लाईव्ह’ची जोरदार (Gautami Patil Item Song) चर्चा रंगणार आहे. 

निर्माते सुमित पांडे रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली ‘लाईव्ह’ सिनेमाची निर्मिती करत आहेत. छबी असीम हल्दर सिनेमाचे प्रस्तुतकर्ते असून, संजीव राय लेखक-दिग्दर्शक आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘लाईव्ह’च्या शुटिंगला सुरुवात करण्यात आली. नुकतंच ‘लाईव्ह’मधील एका महत्त्वाच्या गाण्याचं शुटिंग करण्यात आलं. हे गाणं म्हणजे, लावणीचा तडका असलेलं नव्या धाटणीचं आधुनिक आयटम सॉन्ग आहे. गोरेगाव येथील फीचर स्टुडिओमध्ये या गाण्याचं शुटिंग करण्यात आलं. या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. ‘लागला ठसका 440 चा झटका…’ असे गीतकार अश्पाक एफएच शेख यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे गायिका खुशबू जैन यांनी गायले असून, संगीतकार अमन श्लोक यांनी संगीतबद्ध केले आहे. 

Gautami Patil  Item Song Video: गौतमी पाटीलचा 'लागला ठसका, 440 चा झटका'; 'लाईव्ह'मध्ये लावणीचा तडका असलेलं, प्रत्येकाला थिरकायला लावणारं आयटम सॉन्ग

या चित्रपटातील न्याय-हक्कासाठी नायिकेने केलेल्या संघर्षाची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावी अशी आहे. या कथेच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, समाजातील विविध घटनांचा वेध घेण्यात येणार आहे. गौतमी पाटीलवर चित्रीत करण्यात येत असलेल्या गाण्याबाबत दिग्दर्शक संजीव राय म्हणाले की, समाजातील वास्तव चित्र दाखवणाऱ्या ‘लाईव्ह’ चित्रपटाच्या कथेत ‘लागला ठसका ४४०चा झटका…’ हे गाणे केवळ आयटम साँग असायला हवे म्हणून घेतलेले नाही. हे गाणे असावे ही कथेची गरज आहे. हे गाणे कथेच्या प्रवाहाशी एकरूप होऊन एका नाट्यमय वळणावर येणारे आहे. या महत्त्वाच्या गाण्यासाठी गौतमी पाटीलसारख्या आजच्या काळातील आघाडीच्या नृत्यांगनेची निवड करण्यात आली. गौतमीने आपल्या नृत्याने या गाण्यात रंगत आणली असल्याचेही ते म्हणाले.

Gautami Patil  Item Song Video: गौतमी पाटीलचा 'लागला ठसका, 440 चा झटका'; 'लाईव्ह'मध्ये लावणीचा तडका असलेलं, प्रत्येकाला थिरकायला लावणारं आयटम सॉन्ग

दिग्दर्शक संजीव राय यांनी पूनम विभूते यांनी संवाद लेखन केलेल्या या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकार विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार आहेत. डिओपी गोपी सिनेमॅटोग्राफी करीत असून, सैफुद्दीन शेख या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत. गीतकार अश्पाक एफएच शेख यांच्याखेरीज गीतकार महालिंग कंठाळे यांनीही गीतलेखन केले असून, संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक यांनी चित्रपटातील गीतांना संगीत दिले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mirzapur the movie Teaser Out: रक्तानं माखणार मिर्झापूरची जमीन; काळजाचा ठोका चुकवणारा 2 मिनिटं 22 सेकंदांचा जबरदस्त टीझर, VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *