Suspense Thriller Movie: आजकाल सस्पेन्स थ्रिलर (Suspense Thriller) या प्रकाराला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. OTT माध्यमांमुळे प्रेक्षकांना आता कधीही आपल्या आवडीचे चित्रपट पाहता येतात. दर आठवड्याला, महिन्याला किंवा वर्षाला एखादा असा चित्रपट समोर येतो, ज्याची कथा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवते. पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अशाच एका सप्सेन्स थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले होते. या चित्रपटाचा शेवट इतका जबरदस्त आहे की, तो कितीही वेळा पाहिला तरी प्रेक्षकांचे समाधान होत नाही. कोणता आहे हा चित्रपट, ज्याचा शेवट ‘दृश्यम’ आणि ‘महाराजा’सारख्या चित्रपटां इतकाच जबरदस्त आहे. कोणता चित्रपट आहे हा? (Netflix Suspense Thriller)
खुनाच्या गूढ प्रकरणाभोवती फिरणारी कथा
या चित्रपटाची कथा ‘राणी’ या तरुणीपासून सुरू होते. तिच्यावर तिच्या पतीच्या खुनाचा आरोप असतो. एका स्फोटात तिचा पती जळून गेल्याचे समोर येते, मात्र पोलिसांना त्याचा मृतदेह सापडत नाही. फक्त हाताचा एक तुकडा मिळतो.राणी ही दिल्लीतील बिनधास्त स्वभावाची मुलगी असते. तिचे लग्न एका छोट्या शहरात राहणाऱ्या अभियंत्यासोबत होते. हे लग्न ठरवून झालेले असते आणि लग्नानंतर दोघांमध्ये सतत तणावाचे वातावरण असते.
राणीच्या पतीचा चुलत भाऊ नील वारंवार त्यांच्या घरी येत असतो. हळूहळू राणी आणि नील यांच्यात जवळीक वाढते आणि दोघे प्रेमात पडतात. दरम्यान, राणीच्या डायरीतून पोलिसांना तिचे आणि रिशूचे नाते तणावपूर्ण असल्याचे कळते. त्यामुळे पोलिसांना संशय येतो की, रिशूच्या हत्येमागे राणी आणि नील यांचा हात असू शकतो.मात्र, कथा जसजशी पुढे सरकते, तसतसे असे काही सत्य समोर येते, ज्यामुळे सर्वजण थक्क होतात. चित्रपटाचा शेवट इतका ताकदीने केला आहे की, एक क्षणासाठीही नजर हटवावीशी वाटत नाही.
कोणता आहे हा चित्रपट?
या रहस्य आणि थराराने भरलेल्या चित्रपटाचे नाव आहे ‘हसीन दिलरुबा’(Haseena Dilruba). हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात तापसी पन्नूने राणी, विक्रांत मेसीने रिशू आणि हर्षवर्धन राणेने नीलची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र पहिल्या भागाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद दुसऱ्या भागाला मिळू शकला नाही. ज्यांनी अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल, त्यांनी तो OTT वर पाहू शकतात.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष