मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या बंडखोरीवर शरद पवार बोलले स्पष्ट, थेट.. – Marathi News | Sharad Pawar made significant statement regarding the rebellion by MLAs within the Nationalist Congress Party


शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. 6 खासदार थेट शिवसेना शिंदे गटात गेले. त्यांचा पक्षप्रवेशही झाला. 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटासाठी पत्रही दिले. खासदारांनंतर आता शिवसेना ठाकरे गटातील काही आमदारही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. यावर शिवसेनेसह इतरही पक्ष अलर्ट मोडवर आहेत. आमदारांची बैठकही ठाकरे गटाकडून घेतली जाणार आहे. यादरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटही अलर्ट मोडवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचेही काही आमदार आणि खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. यावर आता स्पष्ट बोलताना शरद पवार दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांंच्या बंडखोरीच्या चर्चांवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.

शरद पवार यांनी म्हटले की, आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही. शरद पवार यांना विचारण्यात आले की, ठाकरेंच्या खासदारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे? यावर शरद पवार यांनी स्पष्ट बोलताना म्हटले की, आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही. यावेळी शरद पवार यांच्यासोबत गाडीत युगेंद्र पवारही होते.

शिवसेना ठाकरे गटातील खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार, खासदार बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता शरद पवार यांनी थेट भाष्य केले. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसू शकतात. पक्षफुटीच्या मुद्द्यात सर्वच पक्ष अलर्ट मोडवर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यात ऑपरेशन टायगर राबवण्यात आले.

ऑपरेशन टायगरच्या मदतीने त्यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फोडले. ज्यावेळी ऑपरेशन टायगरची चर्चा झाली, त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून असे कोणतेही ऑपरेशन आमच्या पक्षात फुट पाडणार नसल्याचे त्यांनी म्हटले. याच पार्श्वभूमीवर मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाने खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला काही खासदार पोहोचले तर काही खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती दर्शवली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *