Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO


Singer Alka Yagnik On Wheelchair Video: आपल्या आवाजानं नव्वदचं दशक गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Famous Singer Alka Yagnik) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना पद्म पुरस्कारानं (Padma Awards) सन्मानित करण्यात आलं. त्यांना पद्म पुरस्कार मिळाल्यानं त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होताच, पण प्रतिष्ठेचा पुरस्कार स्विकारायला जाताना अलका याज्ञिक (Alka Yagnik) यांना तिथे उपस्थित असलेल्या एका सहाय्यकाचा आधार घ्यावा लागला. आपल्या लाडक्या आणि प्रसिद्ध गायिकेची अशी अवस्था पाहून चाहत्यांचं मन हेलावलं. त्यांना नेमकं झालंय काय? त्यांची अशी अवस्था का झालीय? अशा अनेक प्रश्नांनी चाहत्यांच्या मनात काहूर माजलंय.  

प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. हा व्हिडीओ ‘पद्म पुरस्कार’ सोहळ्यातील आहे, जिथे त्यांना नुकताच नवी दिल्ली इथे ‘पद्म भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

व्हीलचेअरवर दिसल्या गायिका अलका याज्ञिक (Singer Alka Yagnik Spotted On Wheelchair)

गायिका अलका याज्ञिक व्हिडीओमध्ये अलका याज्ञिक व्हीलचेअरवर बसलेल्या दिसत आहेत. त्या बऱ्याच अशक्त वाटत असून, त्यांच्यासोबत असलेली एक व्यक्ती त्यांना आधार देताना दिसतेय. हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटू लागली आणि त्यांनी त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केलीय. आपल्या आवडत्या गायिकेला अशा नाजूक अवस्थेत पाहणं अत्यंत हृदयद्रावक असल्याचं चाहत्यांनी म्हटलंय.

एका युजरनं लिहिलंय की, “अलका याज्ञिक जी यांना उत्तम आरोग्य आणि बळ मिळो, हीच सदिच्छा. त्या पूर्णपणे बऱ्या होऊन लवकर परत येतील अशी आशा आहे…” दुसऱ्या एका युजरनं कमेंट केलीय आणि म्हटलंय की, “देव त्यांना लवकर बरे करो; आम्हाला त्यांना पुन्हा एखाद्या संगीत कार्यक्रमात पाहायचे आहेत…”

अलका याज्ञिक यांना नेमकं काय झालंय?

2024 मध्ये, ‘सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस’ (SNHL) या दुर्मिळ श्रवणदोषामुळे आपण त्रस्त असल्याचं जाहीर करून अलका यांनी आपल्या चाहत्यांना धक्का दिलाय. या आजारामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झालाय. सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करताना अलका याज्ञिक यांनी सांगितलं की, एका व्हायरल संसर्गानंतर अचानक त्यांची ऐकण्याची क्षमता बाधित झालीय. त्यांनी लिहिलंय की, काही दिवसांपूर्वी विमानातून उतरल्यानंतर त्यांना अचानक जाणवलं की, त्यांना काहीच ऐकू येत नाहीये. त्यानंतरच्या वैद्यकीय तपासणीत त्यांना ‘सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस’ असल्याचं निदान झालंय. या स्थितीचा त्यांच्या कारकिर्दीवरही परिणाम झालाय, अनेक संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार त्यांना गाण्यांच्या संधी देत ​​असले तरी, आरोग्याच्या कारणांमुळे त्या अद्याप पूर्णपणे रेकॉर्डिंगसाठी परत येऊ शकलेल्या नाहीत. 

अलका याज्ञिक यांनी रेकॉर्ड केलेलं शेवटचं गाणं म्हणजे, इम्तियाज अली यांच्या ‘अमर सिंह चमकिला’ या चित्रपटातील ‘नरम काळजा’ (Naram Kalja) हे होते, ज्याला ए. आर. रहमान यांनी संगीत दिलेलं. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही नव्या गाण्यासाठी आपला आवाज दिलेला नाही. सध्या, चाहते त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत आणि त्या पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच संगीत विश्वात परततील अशी आशा बाळगत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

‘दोन वर्षांपासून खूप कठीण परिस्थितीचा सामना करतेय…’; पद्म भूषण पुरस्कार स्विकारल्यानंतर अलका याज्ञिक यांची भावूक पोस्ट





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *