फक्त ढकललं नाही, आधी फरफटत नेलं? सिया अन् चेतननं केतनसोबत नेमकं काय केलं? घटनास्थळावरील गवतात आढळला महत्त्वाचा पुरावा | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

१८ जून रोजी ज्या कड्यावरून केतनला खाली ढकलले, तिथल्या वाढलेल्या गवतात पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत.

केतनला कसं मारलं?
केतनला कसं मारलं?

पुणे : लोहगड किल्ल्यावरून होणाऱ्या पतीला दरीत ढकलून दिल्याप्रकरणी अटकेत असलेली सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, तरी घटनास्थळावरील एका पुराव्याने पोलिसांचे लक्ष वेधले आहे. १८ जून रोजी ज्या कड्यावरून केतनला खाली ढकलले, तिथल्या वाढलेल्या गवतात पोलिसांना काही संशयास्पद खुणा आढळल्या आहेत. यावरून कड्याच्या टोकावर मृत्यू उभा असताना केतनने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सिया आणि चेतनचा शेवटच्या क्षणी जोरदार प्रतिकार केला असावा, असा दाट संशय आता पोलिसांना आहे.

गवतावरील ‘त्या’ वणांमुळे झटापटीचा संशय

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा अत्यंत बारकाईने पंचनामा केला. या पंचनाम्यातून काही अत्यंत महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. कड्याच्या अगदी जवळ असलेल्या वाढलेल्या गवतामध्ये कोणीतरी फरफटत गेल्यासारख्या खुणा आणि दाबली गेलेली जागा पोलिसांना दिसून आली आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार, केवळ एका धक्क्यात केतन खाली पडला नसावा. आरोपींनी जेव्हा त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा केतनने स्वतःला सावरत आरोपींशी झुंज दिली असावी. या झटापटीतच गवतावर त्या फरफटल्याच्या खुणा उमटल्या असाव्यात, या शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रत्येक पुराव्याची तांत्रिक छाननी करत आहेत. पोलिसांच्या मते, ज्या कड्यावरून केतन पडला, तिथून एखाद्या व्यक्तीचा सहज तोल जाऊन दरीत पडण्याची शक्यता खूपच कमी आहे.

आरोपींनी दिली पोलिसांसमोर कबुली…

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिया केतनला ट्रेकिंगच्या बहाण्याने गडावरील अत्यंत कमी वर्दळीच्या आणि कड्यालगतच्या ठिकाणी घेऊन गेली. तिथे तिने केतनशी संवाद साधत त्याला पूर्णपणे गोड बोलण्यात गुंतवून ठेवले आणि बेसावध केले. केतन सियाशी बोलण्यात मग्न असतानाच, तिथे आधीच दबा धरून बसलेला तिचा प्रियकर चेतन चौधरी मागून आला आणि त्याने केतनला कड्याच्या दिशेने ढकलले.

केतनला दरीत ढकलून दिल्यानंतर चेतन चौधरी तात्काळ घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाला. यानंतर हा खुनाचा कट नसून केवळ एक अपघात आहे, असा भास निर्माण करण्यासाठी सियाने गडावर जोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी गडावरील पायऱ्यांच्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सिया आणि केतनच्या आधीच चेतन चौधरी तिथे पोहोचला होता आणि त्यांच्या आसपास वावरत असल्याचे स्पष्ट दिसले. योग्य संधीची वाट पाहत तो तिथे थांबला होता, हे आता सिद्ध झाले आहे.

आरोपींची कसून चौकशी, तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळावरील या फरफटलेल्या खुणांच्या आधारे पोलीस या संपूर्ण थरारक घटनाक्रमाची सखोल पडताळणी करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/

फक्त ढकललं नाही, आधी फरफटत नेलं? सिया अन् चेतननं केतनसोबत नेमकं काय केलं? घटनास्थळावरील गवतात आढळला महत्त्वाचा पुरावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *