Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: आयपीएल 2027 च्या हंगामाआधी (IPL 2027) ऋषभ पंत आणि कुलदीप यादव (Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade) यांनी आपले संघ बदलले आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एक मोठा ‘ट्रेड’ (खेळाडूंची अदलाबदल) झाला आहे. याबद्दलची चर्चा क्रिकेट वर्तुळात बऱ्याच काळापासून सुरू होती आणि आज 23 जून रोजी आयपीएलने अधिकृतपणे या ट्रेडला दुजोरा दिला. ऋषभ पंत 15 कोटी रुपयांना दिल्लीत परतणार आहेत, तर लखनौने कुलदीप यादवला 13.5 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यात ट्रेड- (Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027)
लखनौ सुपर जायंट्ससोबत दोन वर्षे घालवल्यानंतर, ऋषभ पंत आपल्या जुन्या संघात, म्हणजेच दिल्ली कॅपिटल्समध्ये परतले आहेत. ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्लीकडूनच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. दुसरीकडे, 2022 पासून दिल्लीसाठी खेळणारा कुलदीप यादव आता लखनौसाठी खेळणार आहे. IPL 2027 पूर्वीचा हा लीगचा सर्वात मोठा ‘ट्रेड’ करार मानला जाऊ शकतो, कारण हे दोन्ही खेळाडू केवळ IPL चेच नव्हे, तर भारतीय क्रिकेटचेही स्टार खेळाडू आहेत.
🚨 Announcement 🚨
Rishabh Pant and Kuldeep Yadav complete high-profile trade between @DelhiCapitals and @LucknowIPL.
Rishabh Pant all set to rejoin #DC at INR 15 Crore whereas Kuldeep Yadav will join #LSG at INR 13.5 Crore.
More Details ▶️ https://t.co/64HeOX143I… pic.twitter.com/tIEvj7fgNo
— IndianPremierLeague (@IPL) June 23, 2026
ऋषभचे नुकसान, तर कुलदीपला फायदा- (Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027)
ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्ससोबत 15 कोटी रुपयांच्या पगारावर करार केल्याचे समोर आले आहे. 2025 च्या लिलावात एलएसजीने (LSG) त्याच्यावर 27 कोटी रुपयांची बोली लावून ऋषभ पंतला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवले होते; याचा अर्थ आता ऋषभ पंतला प्रत्यक्षात 12 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. दुसरीकडे, कुलदीप यादवच्या पगारात 25 लाख रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीकडून कुलदीप यादवला 13.25 कोटी रुपये मिळत होते, तर आता लखनौकडून त्याला 13.50 कोटी रुपये मिळतील.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला