मुलांक 3 (3, 12, 21, 30 या तारखांना जन्मलेले लोक): आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांचा राहील. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करताना काही अचानक येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक आवक सामान्यपेक्षा चांगली असेल, पण कुठेही पैसा गुंतवताना आज खूप सावधगिरी बाळगा. व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, तर आज आपल्या बहिणीचा किंवा मुलीचा सल्ला नक्की घ्या, तो तुमच्यासाठी गेमचेंजर ठरेल. कुटुंबातील मोठ्या माणसांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभतील, वैवाहिक आयुष्य सुखाचे राहील. Lucky Number: 3 लकी रंग: सोनेरी
