नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; गोकुळ गितेंना एकनाथ शिंदेंचा फोन, आमदार मुंबईकडे रवाना


मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत नाशिक मतदासंघातील निकालामुळे चांगलीच रंगत आल्याचं दिसून आलं. कारण, महायुतीने नाशिक (Nashik) वगळता सर्वच्या जागांवर विजय मिळवत विधानपरिषद निवडणुकीत एकहातील आपला झेंडा फडकवला आहे. यापूर्वी, 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवल्यानंतर उर्वरीत 11 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यामध्ये, नाशिकमध्ये शिवसेना महायुतीने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली. मात्र, येथे भाजपचे बंडखोर गोकुळ गितेंनी (Gokul gite) शेवटपर्यंत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेर, आजच्या निकालात येथे नरेंद्र दराडेंन धक्का बसल्याचं दिसून आलं, कारण गोकुळ गीतेंनी विजय मिळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता, गोकुळ गीते शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.  

विधानपरिषदेतील निकालानंतर गोकुळ गीते यांना आज एकनाथ शिंदेंची भेट घ्यायला बोलवण्यात आले असून ते नंदनवन बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतील. अशातच त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचा पक्षप्रवेश शिवसेना पक्षात होईल आणि महायुतीमधून ते विजयी उमेदवार म्हणून जाहीर केलं जाईल. त्यामुळे, अपक्ष निवडून आलेले गोकुळ गीते हेही महायुतीचे म्हणून आणखी एक आमदार वाढ होणार असल्याचे सांगण्यात आहे. दरम्यान, ओझर विमानतळावर जाण्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन होता. त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी जात आहे ,राजकीय भूमिका काय आहे ते एक तासाने तुम्हाला कळेल मी नंदनवन येथे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जात आहे, असे गोकुळ गीतेंनी सांगितले. 

शिवसेनेचा विश्वासघात झाला – दराडे

भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धुव्वा उडवला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवून गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या धक्कादायक पराभवामुळे महायुतीला मोठा झटका बसला आहे. दरम्यान, या निकालानंतर शिवसेनेचा विश्वास घात झाल्याची प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. 

एकनाथ शिंदे भाष्य करतील

नरेंद्र दराडे यांच्या पराभव करत गोकुळ गीते यांनी विजय खेचून आणला. याबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री दादा भुसे यांनी अवघ्या दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. “आम्ही सगळ्याची शहानिशा करू. आमचे नेते एकनाथ शिंदे यावर भाष्य करतील,” असे म्हणत दादा भुसे यांनी या निकालावर बोलणे टाळल्याचे पाहायला मिळाले. 

हेही वाचा

ठाकरेंचे आमदार ओमराजेंच्या घरी पोहोचताच एकनाथ शिंदेंची गुप्तचर यंत्रणा अलर्ट, बिल्डिंगबाहेरुन लगेच नंदनवन बंगल्यावर फोन फिरवला, बाणेरमध्ये मध्यरात्री काय घडलंय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *