Ekanath Shinde: ‘ही 6 खासदारांची जुळवाजुळव…’, पत्रकारांचा अडचणीचा प्रश्न, एकनाथ शिंदे थांबले आणि म्हणाले… | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरावून सोडणारी घटना आज मुंबईत पार पडली. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटामध्ये दाखल झाले आहे.

News18
News18

मुंबई: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर अखेर मुंबईमध्ये पूर्ण झालं आहे. ठाकरे गटाचे सहा खासदारांनी उघडपणे एकनाथ शिंदे यांच्या गटाच प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “आम्ही कायद्याच्या चौकटीत, संसदेच्या चौकटीमध्ये ही प्रक्रिया आम्ही केली आहे. उठाव हा २०२२ मध्ये झाला होता. आता हा दुसरा उठवा आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आहे” असं स्पष्टपणे सांगितलं. पण, ६ खासदारांची जुळवाजुळव कशाला असा प्रश्नविचारला असं शिंदेंनी मोजक्याच शब्दात उत्तर दिलं.

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरावून सोडणारी घटना आज मुंबईत पार पडली. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटामध्ये दाखल झाले आहे. यशवंत चव्हाण सेंटरमध्ये ६ खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय बंडू जाधव आणि नागेश आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

लोकसभेमध्ये बिल जुळवाजुळवा करण्यासाठी हे सगळं सुरू आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, एकनाथ शिंदे म्हणाले,  “हे खाासदार कशासाठी आले आहे, याबद्दल मी काही सांगणार नाही, हे कशासाठी आहे, याबद्दल बोलणार नाही. सगळे ६ खासदार हे स्वखुशीने आले आहे. आता अजून काय सांगणारआहे, आता तुम्हाला काय समजायचं आहे, ते समजून घ्या’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“6 टायगर इथं उपस्थितीत आहे. काही काही चालू होतं, आज ६ खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय बंडू जाधव, नागेश आष्टीकर असे खासदार आता आपल्याकडे आहे. आपल्याकडे आत ३ संजय आहे. चौथा हा संजय राठोड आहे. भरपूर संजय आहे. त्यामुळे बाकी कुणाबद्दल बोलतोय गरज नाही. ट्रीपल संजय इकडे आहे, त्यामुळे कुणाची गणती करण्याची गरज नाही’ असं म्हणत शिंदेंनी संजय राऊत यांना टोला लगावला.

“कायद्याच्या चौकटीत, संसदेच्या चौकटीमध्ये ही प्रक्रिया आम्ही केली आहे. उठाव हा २०२२ मध्ये झाला होता. आता हा दुसरा उठवा आहे. पूर्ण कायदेशीर प्रक्रिया, घटनात्मक पूर्तता केली आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आहे. ६ च्या ६ खासदार आहे, शिवसेनेच्या तिकीटावर उभे राहतील आणि ते निवडून येतील” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *