Revati Sule Wedding: खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सदानंद सुळे (Sadanand Sule) यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) हिचा नुकताच विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. तिनं सारंग लखानीसोबत (Sarang Lakhani) साताजन्माची गाठ बांधली. त्यांचा विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डन येथे 20 जून रोजी झाला. या लग्न सोहळ्यात दिग्गज मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी, सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. लग्नपूर्वीच्या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. आता तिच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सुळे आणि पवार कुटुंबाने रेवती सुळेच्या लग्न सोहळ्यात एन्जॉय केलं. सध्या संगीत कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
सुप्रिया सुळे यांच्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांनी स्टेजवर बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला. व्हायरल व्हिडीओमध्ये जय पवार यांनी बॉलिवूड गाण्यावर ठेका धरला. त्यांनी स्टेजवर ‘सोनी दे नखरे’ या गाण्यावर डान्स केला. त्यांनी या बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त डान्स केला. जय पवार यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
युगेंद्र पवार आणि जय पवार यांचा भन्नाट डान्स (Jai Pawar And Yugendra Pawar Dance at Revati sule Sangeet ceremony)
तर, युगेंद्र पवार यांनीही बॉलिवूड गाण्यावर परफॉर्म केला. त्यांनी ‘सुबह होने ना दे’ या गाण्यावर डान्स केला. या दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आधी जय पवार यांचा डान्स होतो. नंतर युगेंद्र पवार हे स्टेजवर परफॉर्म करतात. सध्या रेवती सुळेच्या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
रेवती सुळेचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्यात दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. या लग्न सोहळ्यात लोकसभेचे विरोध पक्षनेते राहुल गांधी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारही उपस्थित होते. यावेळी संगीत कार्यक्रमात शाहरुख खान उपस्थित होता. त्यानं रेवती आणि सारंगसोबत आपली आयकॉनिक स्टेप केली. या लग्न सोहळ्यात शाहरुख खान व्यतिरिक्त बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि खासदार रवि किशन देखील उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष