‘आम्ही खासदारकी आणि मुलीला तिकीट मागितलं नव्हतं’ शिंदेंकडे जाताच दिना पाटील उपकार विसरले, ‘तो नेता शिव्या द्यायचा’ | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

“मी गेल्या ७ वर्षांपासून एका व्यक्तीबद्दल नाराजी व्यक्त करत आहे. मला बोलावलं होतं म्हणून तिथे गेलो होतो. मी माझ्या परिवारासाठी गेलो नाही.

News18
News18

मुंबई: ठाकरे गटाचे  ६ खासदार हे अखेरीस शिवसेना शिंदे गटामध्ये सामील झाले आहे. मुंबईतली खासदार संजय दिना पाटील यांचा सुद्धा यामध्ये सहभाग होता. प्रवेश सोहळा संपल्यानंतर संजय दिना पाटलांनी ठाकरेंची साथ का सोडली, हे सांगताना त्या एका नेत्यावर जोरदार टीका केली. “आम्ही खूप सहन केलं  उद्धव ठाकरे यांच्याकडून बघून.  उद्धव ठाकरेंनंतर हा नेता स्वतःला मोठा नेता समजतो.  आमच्या इथे येऊन स्टेजवर या नेत्यांना मला शिवीगाळ केली’ असं म्हणत संजय दिना पाटलांनी मनातली खदखद बोलून दाखवली.

संजय दिना पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे गट सोडण्यासाठी दिना पाटलांनी ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर जोरदार प्रहार केला.

“हे जर अगोदर आले असते आज अशी वेळी नसती. मी गेलो नसतो तर कोरमचं पूर्ण झाालं नसतं. मला तिथे बोलावलं असतं, माफी मागितली असती तर तिथेच मिटलं असतं. त्यांना ताकदवर लोक नकोय, गुलाम लोक होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी आम्हाला मान दिला. पण एक माणूस चुकीचा होता. स्टेजवर राहून शिव्या द्यायचे, तोंडावर गोड बोलायचे आणि पाठीमागे शिव्या द्यायचे. याबद्दल सगळ्या नेते मंडळींना सांगितलं, पण कााही झालं नाही. पक्षाचे मालक कोण झाले आहे. संजय राऊत यांनी मला चांगला मान, सन्मान दिला. २०१४ मध्ये त्यांनी मला खूप मदत केली. ते मोठे व्यक्ती आहे. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. एकच व्यक्ती होती, आम्हाला कुठे कार्यक्रमाला जाऊ देत नव्हते. बोलू देत नव्हते. निधी वापरू देत नव्हते. आता जे झालं ते झालं. बस्स झालं’ असं म्हणत दिना पाटील मनाातलं बोलून देले.

खासदरकी मागितली नाही, ठाकरेंचे नेतेच काँग्रेसला तिकीट देणार होते

“मी गेल्या ७ वर्षांपासून एका व्यक्तीबद्दल नाराजी व्यक्त करत आहे. मला बोलावलं होतं म्हणून तिथे गेलो होतो. मी माझ्या परिवारासाठी गेलो नाही. माझ्या एकाही कार्यकर्त्याला पद दिलं नाही. मला खासदारकी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या मुलीला तिकीट मागितलं नव्हतं. ती सीट मनसेला जात होती. राज ठाकरे सीट मागत होते, पण माझ्या खांदावर बंदूक ठेवून खासदाराच्या मुलीला तिकीट पाहिजे म्हणून पुढे केलं. माझी मुलगी माझ्या मतदारसंघात काम पाहत होती. आम्ही कुणाचा हक्क मारला नाही. खासदाराची सीट सुद्धा शिवसेनेकडे नव्हती. सगळ्यांनी मेहनत केली. ही जागा शिवसेनेची नव्हती. मी बैठकीला जात नव्हतो. पण काँग्रेसचे नेते मला ऐकवत होते. ही जागा काँग्रेसला देत होते. मी तिनदा लढलो आहे. आमदार होतो. तर ती सीट नको म्हणून काँग्रेसला जाऊ दे. राष्ट्रवादीला देत होते. अस्मलम शेख यांनी हा व्हिडी ओ दाखवला. आमीन पटेल यांनी हा व्हिडीओ दाखवला.

‘खासदारकीची सीट मागितली नाही’

“शिवसेनेकडून नेते हे बोलत होते. माझ्यासाठी सीट मागितली नव्हती. ती सीट जर शिवसेनेकडे गेली असती तरी संजय दिना पाटीलच खासदार झाला असता. पण जो अन्याय झाला, खासदारकी दिली, पण जबाबदारी दिली पाहिजे. साधं शाखाप्रमुख सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना दिलं नाही. तालुका प्रमुख सुद्धा मनिषाताईंना दिलं नाही. तिन वेळा त्या बैठकीला गेल्या तिथून तिन वेळा मातोश्रीतून बाहेर काढलं. माझ्या लोकांचा अपमान केला. त्यानंतर अजित पवार गट स्थापन झाला, तिथे मनिषा ताई गेला. तिथे सिद्धीविनायक मंदिराचं ट्रस्टी दिलं, त्यांची कुवत आहे. ज्यांना ज्यांना पद आहे. मुंबईतील आलेले लोक आहे, मला लोक असतात, आम्ही सुखादुखात असतो. माझा परिवार काम करत आला आहे. १० वर्ष काम करतोय, आमदार खासदार काही नको. मुलुंडसाठी जागा मागितली होती.

‘मनसेची सीट आम्हाला दिली’

“राजूल पाटीलच्या जागी मनसेकडून तिकीट मागण्यात आलं होतं. मात्र आमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जबरदस्ती ती सीटी घेतली कारण ती सीट मनसेला जाऊ नये म्हणून. त्याच बरोबर माझ्या कार्यकर्ते आणि पदाधिका-याचा वारंवार अपमान या नेत्याने केला

माझ्या मुलीलाही शिशीर शिंदे यांच्या प्रचार सभेच्या स्टेजवरून खाली उतरवण्यात आलं होतं.  माझ्या कार्यकर्त्यांना हा नेता तुच्छतेची वागणूक देत होता., असा गौप्यस्फोटही दिना पाटलांनी केला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

‘आम्ही खासदारकी आणि मुलीला तिकीट मागितलं नव्हतं’ शिंदेंकडे जाताच दिना पाटील उपकार विसरले, ‘तो नेता शिव्या द्यायचा’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *