शिंदेंच्या उमेदवाराला पाडून शिंदेसेनेतच प्रवेश, जाएंट किलर गोकुळ गितेंनी असा निर्णय का घेतला? चक्रावणारं कारण | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Gokul Gite Join Eknath Shinde Shiv Sena: महाविकास आघाडीचा उमेदवार नसताना आणि सगळी गणिते महायुतीच्या बाजूने असतानाही, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पराभूत व्हावे लागल्याने दराडे कुटुंबात संतापाची भावना आहे. दुसरीकडे शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाडून जाएंट किलर गोकुळ गिते शिंदेसेनेतच प्रवेश करीत आहेत.

गोकुळ गिते-एकनाथ शिंदे
गोकुळ गिते-एकनाथ शिंदे

नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का दिल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. अनेक विनंत्या-आर्जव केल्यानंतर आणि विविध मंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर गोकुळ गिते यांनी प्रचार बंद केला. यानंतर महायुतीचे नरेंद्र दराडे हेच निवडून येतील, असे बोलले जाऊ लागले. परंतु गोकुळ गिते यांनी पडद्यामागून यंत्रणा फिरवल्याने शिंदेसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपमानास्पदरित्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे गोकुळ गिते हे विजयी झाल्यानंतर नरेंद्र दराडे आणि कुटुंबियांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. काही जणांनी ठरवून शिवसेनेचा केसाने गळा कापला, अशी प्रतिक्रिया दराडे कुटुंबियांनी दिली. महाविकास आघाडीचा उमेदवार नसताना आणि सगळी गणिते महायुतीच्या बाजूने असतानाही, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पराभूत व्हावे लागल्याने दराडे कुटुंबात संतापाची भावना आहे. विजयानंतर झालेल्या बैठकीत गिते कुटुंबाने अचानक शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

शिंदेंच्या उमेदवाराला पाडून जाएंट किलरचा शिंदेसेनेतच प्रवेश, चक्रावणारं कारण

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नाशिक विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या गोकुळ गिते यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. गोकुळ गिते यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला, मात्र आपल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा एक आमदार कमी होणार नाही याची काळजी आपणच घेऊ, अशी भूमिका गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांनी घेतली आहे. शिंदेसेनेतील प्रवेशाचे गिते यांचे हे कारण चक्रावणारे असल्याचे अनेक जण सांगत आहेत.

गोकुळ गिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांचा परवानगीने शिवसेनेत जावे, अशा प्रकारच्या सूचना गणेश गिते यांनी केल्या आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईकडे जात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय गिते यांनी घेतल्याने त्यामागच्या कारणांची चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी गितेंना घेण्यासाठी विशेष विमान धाडलं

नाशिकमध्ये गोकुळ गिते यांना घेण्यासाठी विशेष विमान दाखल झाले आहे, अशी माहिती देखील किशोर आप्पा पाटील यांनी दिली आहे. गोकुळ गिते यांना घेऊन किशोर आप्पा पाटील आणि मंत्री उदय सामंत मुंबईकडे निघाले आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

शिंदेंच्या उमेदवाराला पाडून शिंदेसेनेतच प्रवेश, जाएंट किलर गोकुळ गितेंनी असा निर्णय का घेतला? चक्रावणारं कारण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *