विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये सर्वात मोठा उलटफेर झाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनी या पराभवाची दखल घेतली आहे. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांचा नाशिक मध्ये पराभव झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती मागवली आहे. या पराभवावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुती धर्माचे पालन का झालं नाही ? याबद्दल एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकमधले पदाधिकारी आणि उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांनी माहिती मागवली असं सूत्रांनी सांगितलं.
(बातमी अपडेट होत आहे)