Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींचा श्रीमंतीचा मार्ग मोकळा! आजपासून जूनचा शेवटचा आठवडा, कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 22 to 28 June 2026: आजपासून जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होत आहे. 22 ते 28 जून असा नवा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या पॉवरफुल हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.    

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी जूनचा शेवटच्या आठवड्यात प्रेमजीवनात रोमँटिक वातावरण राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. करिअरमध्ये बढती किंवा नवीन संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या लाभदायक आठवडा ठरेल. आरोग्य सामान्य राहील, पण नियमित व्यायाम आवश्यक आहे.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी जूनचा शेवटचा आठवडा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य आहे. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि विश्वास टिकवणे गरजेचे राहील. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. व्यवसायिकांसाठी विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी प्रवास, शिक्षण आणि नवीन अनुभवांसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमजीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. करिअरमध्ये नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील..

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा मेहनत आणि शिस्त यामुळे प्रगती साधता येईल. प्रेमजीवनात जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये कामाचा ताण वाढू शकतो, पण त्याचे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा नवीन यश मिळेल. प्रेमसंबंधात आनंददायी घडामोडी घडू शकतात. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुलतील. व्यवसायात लाभाचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्य चांगले राहील, परंतु दिनचर्येत नियमितता ठेवा.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा अध्यात्म आणि आत्मचिंतनाकडे तुमचा कल वाढेल. प्रेमजीवनात भावनिक जवळीक वाढेल. करिअरमध्ये घाई न करता संयमाने निर्णय घेतल्यास फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. अनपेक्षित खर्च वाढू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांततेवर भर देणे आवश्यक राहील.

हेही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जूनचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *