खराब जेवण.. सुमार हॉटेल.. विना पगाराचे कोच..! FIFA World Cup स्पर्धेत सेनेगल संघात खळबळ – Marathi News | Senegal Fifa World Cup 2026 squad faces potential internal collapse with unpaid bonuses


खराब जेवण.. सुमार हॉटेल.. विना पगाराचे कोच..! FIFA World Cup स्पर्धेत सेनेगल संघात खळबळImage Credit source: Getty Images

फिफा वर्ल्डकप स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत असताना सेनेगल संघात खळबळ उडाली आहे. या संघाच्या गोटातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. फुटबॉलच्या मैदानात धाक असलेल्या संघाची वाईट अवस्था आहे. या संघाने फुटबॉलचे मैदान गाजवलं आहे आणि त्या संघाची वाईट स्थिती पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अंतर्गत गोंधळ आणि खराब व्यवस्थापनामुळे संघ अडचणीत आला आहे. या संघाच्या गोटातून सुमार नियोजनच्या अनेक बातम्या सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे खेळाडूंपासून प्रशिक्षक वर्गापर्यंत सर्वच चिंतेत असल्याचं दिसत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी खेळाडूंना निश्चित केलेला बोनस अद्याप दिलेला नाही. त्यामुळे आर्थिक गणित बसत नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी आहे.

खेळाडूंच्या जेवणाचे तीनतेरा

सेनेगल संघाचा फुटबॉलमध्ये नावलौकिक आहे. पण त्या संघाची दरारा असूनही त्या दर्जाचं हॉटेल राहण्यासाठी दिलेलं नाही. त्यांना अत्यंत सुमार दर्जाच्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे खेळाडू हॉटेलमध्ये सुविधा नसल्याचे नाराज आहेत. टीमसाठी जेवणाची सोय केलेली कॅटरिंग सेवाही निकृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे खेळाडूंना चांगलं जेवण मिळणं कठीण झालं आहे. त्यात मोठे खेळाडू डाएट पूर्ण करण्यासाठी बाहेरून जेवण ऑर्डर करत आहेत. या वादाचं मुख्य कारण असं आहे की, या संघाचा हेड शेफला खेळाडूंसोबत अमेरिकेला पाठवलेलं नाही. त्यामुळे खेळाडूंच्या जेवणाचे तीनतेरा वाजले आहेत.

विना करार आणि पगाराशिवाय कोच करताहेत काम

सेनेगल संघाचे मुख्य प्रशिक्षक पेप थियाव यांना गेल्या काही महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यांच्यासोबत कोणताही करार केलेला नाही. असं असूनही गेल्या काही महिन्यांपासून ते संघाला प्रशिक्षण देत आहेत. असं असूनही संघाला स्पर्धेत अस्तित्व कायम ठेवण्यासाठी मैदानात लढत द्यावी लागत आहे. दुसरीकडे, फुटबॉल महासंघाच्या अशा वागणुकीमुळे खेळाडूंचं लक्ष खेळावरून विचलित होत आहे. सेनेगल संघाने या स्पर्धेत फक्त एक सामना खेळलेला नाही. त्या सामन्यात फ्रान्सने 3-1 ने मात दिली आहे. आता दुसरा सामना 23 जूनला नॉर्वेविरुद्ध होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *