बेन स्टोक्स-एटकिंसनने यांनी मधेच सोडला काउंटी सामना, नाइटक्लब वाद आणि ECB च्या निर्णयानंतर काय घडलं? – Marathi News | England captain Ben Stokes Atkinson included in the squad for the third Test against New Zealand


बेन स्टोक्स-एटकिंसनने यांनी मधेच सोडला काउंटी सामना, नाइटक्लब वाद आणि ECB च्या निर्णयानंतर काय घडलं?Image Credit source: GETTY IMAGES

Ben Stokes and Gus Atkinson: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने, तर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. पण पहिल्या कसोटी सामन्यात संघाची धुरा सांभाळणारा बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस एटकिंसन दुसऱ्या सामन्यात खेळले नाहीत. नाईटक्लब वादानंतर या दोघांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. इंग्लंड संघातून वगळल्यानंतर ईसीबीने दोघांनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे हे दोघे खेळाडू काउंटी चॅम्पियनशिप सामने खेळत होते. पण तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेत या दोघांना परत बोलावलं आहे. इतकंच काय तर ट्रेंट ब्रिज येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी संघात घेतलं आहे.

बेन स्टोक्स डरहॅम संघाकडून, तर गस एटकिंसन हा सरे संघाकडून खेळत होता. स्टोक्सने डरहॅमकडून खेळताना 95 धावांची खेळी करून आपला फॉर्म दाखवून दिला होता. तर गट एटकिंसनने सरेकडून खेळताना पहिल्या डावात 4 विकेट काढल्या. पण या सामन्याच्या तिसर्‍या दिवसाच्या सुरूवातीपूर्वी ईसीबीच्या आदेशानुसार दोघांनाही सामन्यातून रिलीज करण्यात आलं आहे. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव झाला. त्यामुळे या दोघांनी उणीव दिसून आली. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक आहे. त्यामुळे या सामन्यात करो या मरोची स्थिती आहे. मायदेशात मालिका गमवण्याचा धोका असल्याने या दोन स्टार खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलिओ गे, ओली रॉबिन्सन, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग.

काय झालं होतं नाइटक्लबमध्ये?

लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली होती. या विजयानंतर बेन स्टोक्स आणि गस एटकिंसन यांनी ‘मिडनाइट कर्फ्यू’ चं उल्लंघन केलं होतं. दोघं खेळाडू एका नाईटक्लबमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी तिथे मारामारी केली. त्यात एक सुरक्षा अधिकाऱ्याला दुखापत जाली. त्यामुळे बोर्डाने या दोघांवर कारवाई करत दुसऱ्या कसोटीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *