आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उडी, ऑपरेशन टायगरवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया, थेट म्हणाले, बॉडीही… – Marathi News | Eknath Shinde’s ‘Operation Tiger’ successful; Devendra Fadnavis makes a statement for the first time


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या. या प्रसंगी राज्यातील विरोधकांनी जर जनतेच्या कामाचे प्रश्न मांडले तर त्यांना योग्य सहकार्य केले जाईल, परंतू जर त्यांनी राजकारण करण्याचे ठरवले तर त्यांनी त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असे सांगितल्याने येणारे पावसाळी अधिवेशन वादळी होणार याचे संकेत मिळाले आहेत. विरोधकांनी चहापानाच्या बहिष्कार करणारे पत्र दिले आहे. ते एआयचा वापर करुन तयार केल्याचा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरवर प्रथमच वक्तव्य केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका केली. त्यांनतर पत्रकारांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा. लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही अशा शब्दात पत्रकारांनी उत्तर दिले. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या वडीलांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल होता. त्यामुळे अशा संवेदनशील परिस्थितीत त्यांना शिवीगाळ करणे योग्य नव्हते. त्यांच्याकडे होते तेव्हा तळागाळाचा नेता म्हणायचे आता रिल्स स्टार म्हणत आहेत. सकाळी शिवीगाळ करतात आणि रात्री घरी जाऊन पाय धरतात, म्हणजे नक्कीच काहीतरी केमिकल लोचा आहे अशा मिश्कील शब्दात शिंदे यांनी यावेळी उबाठावर टीका केली.

ऑपरेशन एकदम यशस्वी, बॉडी सुखरुप…

उबाठाच्या या सहा खासदारांना फोडण्याच्या ऑपरेशन टायगर बद्दल इतके दिवस अवाक्षरही न काढणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मध्येच थांबत हे ऑपरेशन एकदम यशस्वी झाले आहे आणि बॉडी सुखरुप आहे अशी टिप्पणी केली. राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात टीका केली असल्याचा प्रश्न करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी काल एक मिम्म पाहिले. राज ठाकरे शांतपणे झोपले आहेत. त्यावर लिहिलंय, मला शांत झोप लागते. कारण माझ्याकडे खासदार नाही, आमदार नाही. त्यामुळे कोणी जाण्याचा प्रश्नच नाही. यावेळी एकच खसखस पिकली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *