Vaibhav Sooryavanshi World Record Sri Lanka A vs India A Final Tri Nation A Series 2026 : श्रीलंका अ संघाविरुद्धच्या तिंरगा मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली. फायनलच्या या हाय-व्होल्टेज सामन्यात वैभवने श्रीलंकेच्या गोलंदाजांना अक्षरशः धू धू धुतले. त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 94 धावांची वादळी खेळी खेळली. दुर्दैवाने, अवघ्या 6 धावांनी त्याचे शतक हुकले, पण बाद होण्यापूर्वी त्याने टीम इंडियाला चांगल्या स्थितीत पोहोचवले.
RUTHLESS REDEMPTION. 😈
Ruthless Boss Baby making sure revenge is s̶w̶e̶e̶t̶ explosive. ☄️🔥 🥵
Watch Sri Lanka ‘A’ vs India ‘A’, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV. 📺#SonySportsNetwork #SonyLIV #TalentTVCup pic.twitter.com/8MH0fKnB8C
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 21, 2026
11 चेंडूंत ठोकले रेकॉर्ड अर्धशतक (Vaibhav Sooryavanshi Misses World Record)
वैभव सूर्यवंशीच्या या तुफानी खेळीचा अंदाज यावरून लावता येतो की, त्याने मैदानात येताच चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या डावात 10 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार ठोकले. विशेष म्हणजे, त्याने अवघ्या 11 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या खेळीदरम्यान सुरुवातीच्या 64 धावा त्याने फक्त चौकार-षटकारच्या मदतीने वसूल केल्या होत्या. अखेर श्रीलंकेचा कर्णधार सहान अराच्चिगेच्या चेंडूंवर विजयकांतने त्याचा झेल घेतला आणि ही वादळी खेळी संपुष्टात आली.
Vaibhav Sooryavanshi says ‘Good Morning’ 💥
Watch Sri Lanka ‘A’ vs India ‘A’, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV. 📺#SonySportsNetwork #SonyLIV #TalentTVCup pic.twitter.com/e5PDd6NNPd
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 21, 2026
मैदानावरील वादाचा वचपा काढला (Vaibhav Sooryavanshi India A vs Sri Lanka A Tri-Nation Series Final)
तिंरगा मालिकेतील मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्धच्या सुपर ओव्हरदरम्यान वैभव अपयशी ठरला होता. त्यावेळी श्रीलंकन खेळाडूंनी त्याच्यासोबत मैदानावर हुज्जत घातली होती, अगदी ऑन-कॅमेरा धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण गेले होते. मात्र, वैभवने त्यावेळी संयम राखला आणि आपल्या रागाचा बदला फायनलमध्ये बॅटने घेतला. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारताला फलंदाजी दिली होती, आणि 15 षटकांत भारताने 2 बाद 153 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा सध्या खेळत आहेत.
VAIBHAV SOORYAVANSHI – TAKE A BOW 🥹❤️
94 RUNS FROM JUST 29 BALLS IN THE TRI SERIES FINAL vs SRI LANKA.
ANGRY SOORYAVANSHI HAS DONE IT..!!! pic.twitter.com/zksNsJrX8j
— Johns. (@CricCrazyJohns) June 21, 2026
इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यापूर्वी मोठा इशारा
या मालिकेतील दमदार कामगिरीनंतर वैभव आता टीम इंडियाच्या मुख्य संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या दौऱ्यापूर्वीच वैभवने या दोन्ही संघांना आपल्या वादळी फॉर्मचा इशारा दिला आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला