पुढील आठवड्यात चार दिवस बँका बंद असणार; नेमक्या कोणत्या दिवशी सुट्टी असणार? पाहा तारीख – Marathi News | Banks will remain closed for up to four days between 22nd to 28th june 2026


उद्यापासून नवीन आठवडा सुरू होत आहे. तर येत्या आठवड्यात, 22 जून ते 28 जून 2026 दरम्यान, भारतातील खाजगी आणि सार्वजनिक बँका चार दिवस बंद राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय, प्रादेशिक आणि धार्मिक सुट्ट्यांच्या आधारावर या महिन्यातील अकरा सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि सर्व रविवार यांचा समावेश आहे. या सुट्ट्या देशभरात लागू होणार नाहीत; काही सुट्ट्या विशिष्ट राज्ये आणि शहरांपुरत्या मर्यादित आहेत. यामुळे बँकेत जाण्यापूर्वी एकदा या सुट्ट्यांवर नजर घाला. जर तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर ती ज्या दिवशी सुट्ट्या नसतील तेव्हा उरकून घ्या अन्यथा काम वेळेवर होणार नाहीत.

पुढील आठवड्यातील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

  • 22 जून (सोमवार) – रथयात्रेच्या निमित्ताने ओडिशा, पश्चिम बंगाल आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
  • 25 जून (गुरुवार) – मोहरमच्या विशेष निमित्ताने केवळ विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे बँका बंद राहतील.
  • 26 जून (शुक्रवार) – मोहरम/आशुराच्या निमित्ताने देशभरातील बहुतेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळूर, पाटणा, जयपूर, भोपाळ आणि इतर अनेक प्रमुख शहरांचा समावेश आहे.
  • 27 जून (शनिवार) – हा महिन्याचा चौथा शनिवार आहे, त्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका या दिवशी बंद असतात.
  • 28 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टीमुळे या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.

सलग तीन दिवस बंद
जर तुम्ही उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा बिहारचे रहिवासी असाल, तर 26 जून (शुक्रवार) ते 28 जून (रविवार) पर्यंत बँका सलग तीन दिवस बंद राहतील. त्यामुळे, चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट प्रोसेसिंग किंवा रोख रक्कम जमा करण्याची कामे गुरुवार, 25 जून रोजी पूर्ण करा.

डिजिटल बँकिंगवर अवलंबून रहा

सुट्ट्यांमुळे बँकेच्या शाखा बंद असू शकतात, परंतु काळजी करण्याची गरज नाही कारण नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय (गुगल पे, फोनपे) आणि एटीएम यांसारख्या सर्व ऑनलाइन डिजिटल सेवा 24 तास सुरू राहतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *