विदर्भाच्या शिक्षक चळवळीचा महामेरु हरपला, माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचं निधन 


B. T. Deshmukh passes away : विदर्भाच्या शिक्षक चळवळीचा महामेरु असलेले माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 87 वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमरावतीमध्ये त्याचं निधन झालं आहे. 30 वर्षे  त्यांनी विधान परिषदेत आवाज गाजवला. सिंचन अनुशेषाच्या लढ्यातील मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

विदर्भाच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्राचे मार्गदर्शक

विदर्भाच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्राचे मार्गदर्शक, अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचे वयाच्या 87 व्या वर्षी अमरावतीत दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एका अभ्यासू आणि निस्पृह संसदीय पर्वाचा अंत झाला आहे. सलग तीन दशके विधान परिषदेत शिक्षकांचे आणि पदवीधरांचे अचूक प्रतिनिधित्व करणारे डॉ. देशमुख ‘नुटा’ (NUTA) संघटनेचे शिल्पकार होते.. सभागृहात केवळ आकडेवारी आणि पुराव्यांच्या आधारे सरकारला धारेवर धरण्याचे त्यांचे कसब अद्वितीय होते. विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न राज्य पातळीवर मांडून त्यांनी या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी सायंकाळी 5 वाजता अमरावतीत अंत्यसंस्कार केले जाणार असून, सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *