Last Updated:
सलग तीन दशकं विधान परिषदेत शिक्षकांचे आणि पदवीधरांचे अचूक प्रतिनिधित्व करणारे डॉ. देशमुख ‘नुटा’ (NUTA) संघटनेचे शिल्पकार होते
अमरावती : विदर्भाच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्राचे मार्गदर्शक, अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आणि प्राध्यापक डॉ. बी. टी. देशमुख यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी अमरावतीत दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एका अभ्यासू आणि निस्पृह संसदीय पर्वाचा अंत झाला आहे.
सलग तीन दशकं विधान परिषदेत शिक्षकांचे आणि पदवीधरांचे अचूक प्रतिनिधित्व करणारे डॉ. देशमुख ‘नुटा’ (NUTA) संघटनेचे शिल्पकार होते. सभागृहात केवळ आकडेवारी आणि पुराव्यांच्या आधारे सरकारला धारेवर धरण्याचे त्यांचे कसब अद्वितीय होते. विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न राज्य पातळीवर मांडून त्यांनी या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी ५ वाजता अमरावतीत अंत्यसंस्कार केले जाणार असून, सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
Amravati,Amravati,Maharashtra
Jun 19, 2026 10:40 PM IST
