Father’s Day 2026: फादर्स डे’ लवकरच, पण कोणत्या तारखेला? सर्वात आधी पितृदिन कधी साजरा करण्यात आला? इतिहास, तारीख, महत्त्व….


Father’s Day 2026: बाबा….पप्पा…डॅडी… वडील म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ…वडील म्हणजे घराचा कणखर आधार… कुटुंबासाठी सतत झटणारा निस्वार्थी योद्धा… आयुष्यभर साथ देणारी प्रेरणा…आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी वडिल आयुष्यभर मेहनत घेत असतात. आईप्रमाणेच वडिलांचे प्रेमही अतिशय निस्वार्थी असते, मात्र अनेकदा ते आपल्या भावना कृतीतून व्यक्त करतात. जागतिक पितृदिन म्हणजेच Father’s Day हा वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांच्या त्यागाची, मेहनतीची आणि प्रेमाची जाणीव करून देत त्यांना सन्मान देण्याची ही एक सुंदर संधी आहे. या दिवशी एक छोटासा “धन्यवाद” किंवा प्रेमाने व्यक्त केलेला आदरही वडिलांसाठी अमूल्य ठरतो. मात्र हा फादर्स डे यंदा आहे तरी कधी? कोणत्या तारखेला यंदा साजरा करण्यात येणार आहे? इतिहास, तारीख, महत्त्व जाणून घ्या…

‘फादर्स डे’ हा सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला? (Father’s Day 2026)

अनेकांच्या मनात असे प्रश्न असतील की ‘फादर्स डे’ हा सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला? याची मूळ कल्पना कोणाची आहे? खरं सांगायचं तर या फादर्स डे ची मूळ कल्पना ही अमेरिका या देशाची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1910 मध्ये सुरु झालेल्या ‘मदर्स डे’ पासून मिळाली. भारतातही हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देखील दिल्या जातात. फादर्स डे हा आपल्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. हा एक असा दिवस आहे जो आपल्या मुलांप्रती वडिलांचे असलेले प्रेम, आदर आणि शिकवणीची तसेच त्यागाची आठवण करून देतो. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या वडिलांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘फादर्स डे’ हा दिवस साजरा केला जातो. 

‘फादर्स डे’ चा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या…

सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. सोनोराची आई फार लवकर मरण पावली. त्यानंतर सोनोराने तिच्या वडिलांसोबत लहान भावंडांना वाढवले. सोनोराला वाटले की नवीन मान्यताप्राप्त मदर्स डे बद्दल चर्चचा प्रवचन ऐकताना वडिलांना ओळखीची गरज आहे. तिच्या वडिलांबद्दल अत्यंत प्रेम आणि आदर दाखवून, तिने स्पोकेन मंत्रिमंडळाशी संपर्क साधला आणि त्यांना तिच्या वडिलांचा वाढदिवस, 5 जून हा फादर्स डे म्हणून ओळखण्यास सांगितले. मात्र, त्यांनी हा प्रसंग महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ठेवण्याचा निर्णय घेतला.

अन् तेव्हापासून फादर्स डे लोकप्रिय झाला…

वर्षानुवर्षे, फादर्स डे लोकप्रिय झाला आणि देशभरात साजरा केला गेला. त्यावेळचे अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी 1966 मध्ये अधिकृतपणे जूनचा तिसरा रविवार फादर्स डे म्हणून घोषित करण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. त्यानुसार, 19 जून हा फादर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. जगाच्या अनेक भागांत ‘फादर्स डे’ हा सुट्टीचा दिवस मानला जात असला तरी भारतात मात्र हा दिवस तितक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही. मात्र, या दिवशी आपल्या वडिलांना भेटवस्तू देऊन त्यांना वेळ देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले जाते. 

हेही वाचा

Shravan 2026: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता..श्रावण महिना ‘या’ दिवसापासून होतोय सुरू! यंदा श्रावणी सोमवार किती? धार्मिक महत्त्व, तिथी, संबंधित माहिती…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *