MK Stalin on Rahul Gandhi: ‘तेव्हा विचारांचा भाऊ ते आता फक्त…’ अवघ्या काही दिवसांत सर्व काही बदललं! स्टॅलिन यांनी राहुल गांधींना दिलेल्या शुभेच्छांनी भूवया उंचावल्या, मात्र त्याचवेळी सीएम थलापती विजय यांनी टायमिंग साधली


MK Stalin on Rahul Gandhi: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत DMK चा धक्कादायक पराभव झाल्यानंतर, काँग्रेसने 4 मे च्या निकालानंतर दोनच दिवसांनी (6 मे रोजी) अचानक DMK सोबतची आघाडी तोडली. तेव्हापासून डीएमके आणि काँग्रेसमधील अंतर वाढत गेलं आहे. संसदेतही दोन्ही एकमेकांपासून दूर गेले. आता नात्यांमध्येही कोरडेपणा आल्याचे आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आज  (19 जून) स्टॅलिन यांना दिलेल्या शुभेच्छांवरून स्पष्ट झाले.  एम. के. स्टॅलिन यांच्या राहुल गांधींना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमधून हा दुरावा स्पष्ट दिसून येतो. 2025 मध्ये स्टॅलिन यांनी राहुल गांधींना अत्यंत जिव्हाळ्याने ‘विचारांचा भाऊ’ (brother-in-ideals) म्हटले होते. मात्र, 2026 मध्ये आघाडी तुटल्यानंतर त्यांनी अतिशय औपचारिकपणे केवळ ‘विरोधी पक्षनेते’ असा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या आणि त्यातून ‘भाऊ’ हा शब्द वगळला.

काँग्रेसची नवीन आघाडी आणि विजय यांचे सरकार

काँग्रेसने DMKची साथ सोडून अभिनेता-राजकारणी विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाला पाठिंबा दिला. काँग्रेस आणि इतर लहान पक्षांच्या पाठिंब्यामुळे टीव्हीकेने बहुमत मिळवून सरकार स्थापन केले. तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नवे मित्रपक्षनेते विजय यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टमध्ये राहुल गांधींचा ‘माझा प्रिय भाऊ’ असा उल्लेख करत त्यांच्याशी असलेली राजकीय जवळीक स्पष्ट केली. दुसरीकडे, काँग्रेसने आघाडी तोडल्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी काँग्रेसवर “पाठीत खंजीर खुपसल्याचा” आरोप केला. DMK ने लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून संसदेत काँग्रेस सदस्यांसोबत बसणे योग्य ठरणार नाही असे कळवले आणि 8 जून रोजी झालेल्या ‘इंडिया’ (INDIA) विरोधी आघाडीच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली.

‘मुरासोली’मधून राहुल गांधींवर टीका

दरम्यान, DMK चे अधिकृत मुखपत्र असलेल्या ‘मुरासोली’ने राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि डाव्या पक्षांवर राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत, ते विरोधी पक्षांच्या एकजुटीला कसे कमकुवत करत आहेत, असा सवाल या अग्रलेखात विचारण्यात आला. दुसरीकडे, ही आघाडी तुटण्याची चिन्हे निवडणुकांपूर्वीच दिसत होती. दोघांमधील मतभेद इतके होते की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी आणि स्टॅलिन यांनी एकाच मंचावर येणे टाळले होते.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *