Last Updated:
Navi Mumbai : जेएनपीटी बंदरावर आलेल्या एका मोठ्या पार्सलबाबत अधिकाऱ्यांना संशय आला. जेव्हा त्यांनी त्या मेकअप प्रॉडक्ट्सची कसून तपासणी केली तेव्हा आत काहीतरी भलतंच आढळलं. या करोडोंच्या गुप्त प्रकरणाचा तपास आता यंत्रणा करत आहेत.
नवी मुंबई : भारतीय बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय वस्तूंची मागणी ही गेल्या काही वर्षांपासून वाढत चालेली आहे. याच वाढच्या मागणीचा फायदा घेत बऱ्याचदा सरकारी महसूल बुडवण्याचे ही अनेक नवीन मार्ग शोधले जातात. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच एका महत्त्वाच्या बंदरावर उघडकीस आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधून एक आयात करण्यात कंटेनर होता. ज्यामध्ये सौंदर्यप्रसाधनांचा मोठा साठा असल्याची माहिती ही डीआरआयला म्हणजे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या स्थानिक शाखेला मिळाली होती. पण संबंधित कागदपत्रांमध्ये या मालाची नोंद खरं तर अमोनियम बायकार्बोनेट अशी करण्यात आली होती. जी की खरं तर फक्त औद्योगित वापरासाठी असी असते. याच एका गोष्टीमुळे अधिकाऱ्यांना संशय आला आणि या कंटेनरमधल्या सर्व मालाची चौकशी करण्याचे ठरवले.
त्यानुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 8 जून रोजी संशयित कंटेनर अडवला आणि तो ताब्यात घेतला. मग त्यानुसार कंटेनरची तपासणी करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने अधिकाऱ्यांना आढळून आली. धक्कादायक म्हणजे प्राथमिक तपासात या सर्व मालाच्या स्वरुपाबाबत खोटी घोषणा करण्यात आल्याचे समोर आले.
अधिकाऱ्यांनी त्यांनतर पुढील तपास सुरु केला. ज्यामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या आयात प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे, व्यवहार शिवाय संबंधित व्यक्तींचीही माहिती तपासली गेली. याच तपासात सर्व मालाची चुकीची माहिती देऊन शिवाय सीमाशुल्क नियमांती दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरमात सहभागी असलेल्या दोघांना अटकही करण्यात आलेली आहे,
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जप्त करण्यात आलेल्या या सौंदर्यप्रसाधनांची अंदाजे बाजार किंमत ही तब्बल 7.35 कोटी रुपये असल्याचे समोर आले. सध्या डीआरआयकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे शिाय यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का, त्याचाही तपास होत आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 19, 2026 11:31 AM IST
JNPT अधिकाऱ्याला संशय आला, मेकअप प्रॉडक्टच्या आत निघालं भलतंच, समोर येताच सगळेच चक्रावले
