‘न्यूज१८’ ला दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीने तिच्या मनातील भीती आणि व्यावसायिक बदल यावर भाष्य केले. ती म्हणाली, “कॅन्सरच्या त्या अत्यंत वेदनादायी आणि कठीण कालखंडातून बाहेर पडल्यानंतर, मला मानसिकदृष्ट्या खूप आनंदी राहायचे होते. त्यामुळे मी ठरवले होते की, यापुढे मी फक्त अशाच भूमिका करेन ज्या मनाला उमेद देतील, हलक्या-फुलक्या असतील आणि ज्यामुळे सेटवर सकारात्मक वातावरण राहील.”
